जिल्ह्यात १६४४ वाहनांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:22 AM2021-04-19T04:22:25+5:302021-04-19T04:22:25+5:30

कोल्हापूर : कोरोना संसर्गाची ‘ब्रेक द चेन’ करण्यासाठी पुकारलेल्या संचारबंदीत रविवारी विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या १६४४ वाहनांवर कारवाई करण्यात आली. ...

Action on 1644 vehicles in the district | जिल्ह्यात १६४४ वाहनांवर कारवाई

जिल्ह्यात १६४४ वाहनांवर कारवाई

Next

कोल्हापूर : कोरोना संसर्गाची ‘ब्रेक द चेन’ करण्यासाठी पुकारलेल्या संचारबंदीत रविवारी विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या १६४४ वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यांपैकी १४२० वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करून सुमारे ३ लाख १० हजार ३०० रुपये दंड वसूल केला, तर तब्बल २२४ वाहने जप्त केली.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने गुरुवारपासून संचारबंदी पुकारली आहे. त्यामुळे विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना पोलीस कारवाईला सामोरे जावे लागत आहे. रविवारी जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यावर पोलीस नाकाबंदी करून कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. त्यामध्ये विनामास्क फिरणाऱ्या १९२ जणांकडून ६७ हजार ३०० रुपये दंड वसूल केला, तर २२४ वाहने जप्त केली. त्याशिवाय १४२० वाहनांवर गुन्हे नोंदवून त्यांच्याकडून तीन लाख १० हजार ३०० रुपये दंड वसूल केला.

कोल्हापूर शहरातही मोठ्या प्रमाणात सकाळ व सायंकाळ अशा दोन वेळेत प्रमुख मार्गावर व प्रमुख चौकात नाकाबंदी करून वाहनांवर कारवाई करण्यात आली.

फोटो नं. १८०४२०२१-कोल-पोलीस ॲक्शन०१

ओळ : कोल्हापूर शहरात रविवारी संचारबंदीत विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनधारकांची पोलिसांनी नाकाबंदी करून तपासणी, तसेच विचारपूस केली. (छाया : नसीर अत्तार)

फोटो नं. १८०४२०२१-कोल-पोलीस ॲक्शन०२

ओळ : संचारबंदी कालावधीत विनाकारण रस्त्यावर फिरणारी दुचाकी वाहने पोलिसांनी जप्त करून शहर वाहतूक नियंत्रण शाखेत आणली. (छाया : नसीर अत्तार)

===Photopath===

180421\18kol_12_18042021_5.jpg~180421\18kol_13_18042021_5.jpg

===Caption===

फोटो नं. १८०४२०२१-कोल-पोलीस ॲक्शन०१ओळ : कोल्हापूर शहरात रविवारी संचारबंदीत विनाकारण रस्त्यावर फिरणार्या वाहनधारकांची पोलिसांनी नाकाबंदी करुन तपासणी तसेच विचारपूस केली. (छाया: नसीर अत्तार)फोटो नं. १८०४२०२१-कोल-पोलीस ॲक्शन०२ओळ : संचारबंदी कालावधीत विनाकारण रस्त्यावर फिरणारी दुचाकी वाहने पोलिसांनी जप्त करुन शहर वाहतुक नियंत्रण शाखेत आणली (छाया: नसीर अत्तार)~फोटो नं. १८०४२०२१-कोल-पोलीस ॲक्शन०१ओळ : कोल्हापूर शहरात रविवारी संचारबंदीत विनाकारण रस्त्यावर फिरणार्या वाहनधारकांची पोलिसांनी नाकाबंदी करुन तपासणी तसेच विचारपूस केली. (छाया: नसीर अत्तार)फोटो नं. १८०४२०२१-कोल-पोलीस ॲक्शन०२ओळ : संचारबंदी कालावधीत विनाकारण रस्त्यावर फिरणारी दुचाकी वाहने पोलिसांनी जप्त करुन शहर वाहतुक नियंत्रण शाखेत आणली (छाया: नसीर अत्तार)

Web Title: Action on 1644 vehicles in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.