जिल्ह्यात १८८३ वाहनांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:28 AM2021-04-30T04:28:24+5:302021-04-30T04:28:24+5:30

कोल्हापूर : कोरोनामुळे पुकारलेल्या संचारबंदीच्या कालावधीत विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईचा धडाका कोल्हापूर पोलीस दलामार्फत सुरूच ठेवला आहे. बुधवारी ...

Action on 1883 vehicles in the district | जिल्ह्यात १८८३ वाहनांवर कारवाई

जिल्ह्यात १८८३ वाहनांवर कारवाई

Next

कोल्हापूर : कोरोनामुळे पुकारलेल्या संचारबंदीच्या कालावधीत विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईचा धडाका कोल्हापूर पोलीस दलामार्फत सुरूच ठेवला आहे. बुधवारी दिवसभरात १८८३ वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून सुमारे एक लाख ४९ हजार रुपये दंड वसूल केला. याशिवाय १४१ दुचाकी वाहने जप्त केली.

संचारबंदीच्या निर्देशांचे काटेकोर पालन करण्यासाठी जिल्हा पोलीस यंत्रणा बंदोबस्त बजावत आहे. शहरासह जिल्ह्यात दिवसभर विनाकारण फिरणाऱ्या एकूण १८८३ वाहनांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला. त्यांपैकी १७४२ वाहनांवर गुन्हे नोंदवून त्यांच्याकडून दंड वसूल केला.

कारवाईत दंड वसूल

- विनामास्क प्रकरणी ३८३ जणांवर कारवाई : ९१,८०० रुपये दंड वसूल

- मोटार व्हेईकल ॲक्‍टप्रकरणी १७४२ जणांवर कारवाई : १,४९,०००

- वाहने जप्त : १४१

Web Title: Action on 1883 vehicles in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.