हुपरीत १५० जणांविरोधात कारावई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:18 AM2021-06-21T04:18:06+5:302021-06-21T04:18:06+5:30

हुपरी : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शनिवार व रविवार असे दोन दिवस वीकेंड लॉकडाऊन घोषित केला आहे. तरीही ...

Action against 150 people in Hupari | हुपरीत १५० जणांविरोधात कारावई

हुपरीत १५० जणांविरोधात कारावई

Next

हुपरी : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शनिवार व रविवार असे दोन दिवस वीकेंड लॉकडाऊन घोषित केला आहे. तरीही हुपरी (ता. हातकणंगले) शहरात मोकाट फिरणाऱ्यांचे प्रमाण वाढलेलेच आहे. अशा मोकाट फिरणाऱ्या १५० हून अधिक मोटारसायकलस्वारांवर हुपरी पोलिसांनी रविवारी कारवाई करून त्यांची आरटीपीसीआर व अँटिजन तपासणी केली.

कोरोना संसर्ग थांबविण्यासाठी नगरपरिषद व हुपरी पोलिसांनी शहरातील औषध दुकानांव्यतिरिक्त इतर सर्व व्यवसाय व व्यापार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणीही सुरू आहे. नगरपरिषद प्रशासनाकडून संपूर्ण नागरिकांची आरटीपीसी आर व अँटिजन तपासणी करण्यात येत आहे. रविवार सकाळपासून पोलीस ठाण्यासमोरच मोकाट फिरणाऱ्या अशा १५० हून अधिक मोटारसायकलस्वारांवर कारवाई करून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने अँटिजन चाचणी करण्यात आली. या मोहिमेत पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, सहायक पोलीस निरीक्षक विजय मस्कर व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.

-

-------::-------

फोटो ओळी-वीकेंड लॉकडाऊन कालावधीत हुपरी (ता. हातकणंगले) शहरात मोकाट फिरणाऱ्या १५० हून अधिक मोटारसायकलस्वारांवर हुपरी पोलिसांनी रविवारी कारवाई करून त्यांची अँटिजन चाचणी केली.

Web Title: Action against 150 people in Hupari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.