कोरोनाचे नियम भंग करणाऱ्या १९२ लोकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:22 AM2021-03-08T04:22:22+5:302021-03-08T04:22:22+5:30
कोल्हापूर : महापालिका पथकाकडून विनामास्क, सोशल डिस्टन्स व सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याबाबत १९२ लोकांवर कारवाई करून २८ हजार ३०० रुपये ...
कोल्हापूर : महापालिका पथकाकडून विनामास्क, सोशल डिस्टन्स व सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याबाबत १९२ लोकांवर कारवाई करून २८ हजार ३०० रुपये दंड वसूल केला. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महानगरपालिका, के.एम.टी. आणि पोलीस पथकाकडून ही कारवाई केली.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर ठेवणे, हॅण्डग्लोज वापरने, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे या प्रतिबंधक गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे. मात्र, शहरात काही बेशिस्त लोकांकडून या नियमांचा भंग होत आहे. अशा लोकांना वठणीवर आणण्यासाठी महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. गुरुवारी विनामास्क १७३ लोकांकडून १७३००, सोशल डिस्टन्स ८ लोकांकडून ४०००, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याबाबत १० लोकांकडून २००० तसेच प्लास्टिकचा वापर केल्यामुळे १ व्यक्तीकडून ५००० असे एकूण १९२ लोकांवर कारवाई केली.
प्रतिक्रिया
शहरामध्ये गर्दी वाढत असल्याने नागरिकांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. सण, समारंभ, धार्मिक स्थळे, भाजी मार्केट याठिकाणी नागरिकांनी नियमितपणे मास्कचा वापर करावा, सॅनिटाईजरचा वापर करावा तसेच सामाजिक अंतराचे पालन करावे.
कादंबरी बलकवडे, महापालिका प्रशासक