कोरोनाचे नियम मोडणाऱ्या २०१ जणांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:21 AM2021-03-15T04:21:57+5:302021-03-15T04:21:57+5:30
कोल्हापूर : कोरोनाची साथ अद्यापही १०० टक्के आटोक्यात आलेली नाही. तरीही काही बेशिस्त नागरिक नियमांचा भंग करीत आहेत. अशांवर ...
कोल्हापूर : कोरोनाची साथ अद्यापही १०० टक्के आटोक्यात आलेली नाही. तरीही काही बेशिस्त नागरिक नियमांचा भंग करीत आहेत. अशांवर कारवाईसाठी महानगरपालिका, केएमटी आणि पोलीस यांचे पथक तैनात केले आहे. रविवारी पथकाकडून २०१ लोकांवर कारवाई केली. ३४ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर ठेवणे, हॅण्डग्लोज वापरणे, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे या प्रतिबंधक गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे. मात्र, शहरातील काहींकडून याची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. अशांवर कडक कारवाई करण्याचे आदेश डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिले आहेत. विनामास्क १८४ लोकांकडून १८४००, सोशल डिस्टन्स ६ लोकांकडून ४०००, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याबाबत ९ लोकांकडून १८०० व प्लास्टिकचा वापर केलेल्या २ व्यक्तींकडून १००००, असा एकूण ३४ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.