इचलकरंजीत २३९ जणांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:24 AM2021-04-17T04:24:48+5:302021-04-17T04:24:48+5:30
इचलकरंजी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असताना विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली. शहर वाहतूक शाखा, गावभाग व शिवाजीनगर पोलिसांनी एकूण ...
इचलकरंजी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असताना विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली. शहर वाहतूक शाखा, गावभाग व शिवाजीनगर पोलिसांनी एकूण २३९ मोटारसायकलींवर कारवाई करून वाहने जप्त केली. त्यांच्याकडून सुमारे ६० हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला.
शिवाजीनगर पोलिसांनी ४५ मोटारसायकली जप्त केल्या असून, विनामास्क फिरणाऱ्या २५ जणांवर दंडात्मक कारवाई केली. गावभाग पोलिसांनी ८३ वाहनधारकांवर कारवाई करत ३८ हजार रुपयांचा दंड वसूल केला, तर ३४ मोटारसायकली जप्त केल्या आहेत. तसेच लसीकरण व आरटीपीसीआर बंधनकारक असताना हॉटेलचे पार्सल ग्राहकांना नेत असल्याचे खोटे सांगून विनाकारण फिरणाऱ्या निशांत शशिकांत बडवे (वय ४०, रा. विक्रमनगर) याच्यावर १८८ प्रमाणे गुन्हा दाखल केला. शहर वाहतूक पोलिसांनी १६० मोटारसायकली जप्त केल्या, तर २० हजार ७०० रुपयांचा दंड वसूल केला.
फोटो ओळी
१६०४२०२१-आयसीएच-०७
विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांच्या मोटारसायकली वाहतूक शाखेच्या पोलिसांनी जप्त केल्या.
छाया- अनंतसिंग