आठ महिन्यांत तंबाखू नियंत्रणअंतर्गत ३८ जणावंर कारवाई,५ हजारांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 08:24 PM2020-12-24T20:24:59+5:302020-12-24T20:29:14+5:30
Tobacco Ban Collcator Kolhapur- राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांत ३८ जणांवर कारवाई करीत ५ हजार ४०० रुपये दंड वसुली करण्यात आली आहे. तंबाखू मुक्तीसाठी जनजागृती, प्रबोधन याबरोबरच दंडात्मक कारवाईही करावी. त्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांची मदत घ्यावी, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी गुरुवारी दिले.
कोल्हापूर : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांत ३८ जणांवर कारवाई करीत ५ हजार ४०० रुपये दंड वसुली करण्यात आली आहे. तंबाखू मुक्तीसाठी जनजागृती, प्रबोधन याबरोबरच दंडात्मक कारवाईही करावी. त्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांची मदत घ्यावी, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी गुरुवारी दिले.
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हास्तरीय समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झाली.
प्रभारी जिल्हा सल्लागार चारुशिला कणसे म्हणाल्या, कोटपा कायदा २००३ च्या अंमलबजावणीसाठी पुढील महिन्यात अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक यांची कार्यशाळा घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध ठिकाणी धाडी घालण्यात येणार आहेत. तंबाखूमुक्त शाळा अभियानांतर्गत शाळेपासून १०० यार्ड परिसरात पिवळ्या रंगाचा पट्टा आखण्यात येणार आहे. यावेळी सर्वांनी तंबाखूमुक्तीची शपथ घेतली. प्रल्हाद देवकर यांनी स्वागत केले.
एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान करण्यात आलेली दंड वसुली
विभाग व्यक्तींची संख्या दंड वसुली
आरोग्य : २४ : २ हजार ६००
पोलीस : १३ : २ हजार ६००
अन्न व औषध प्रशासन : १ हजार २००
जनजागृती स्पर्धेत प्रियांका लिंगडे राज्यात चौथ्या
महात्मा गांधी जयंतीनिमित्त राज्य शासनातर्फे तंबाखूमुक्त जनजागृती मोहिमेसाठी आयोजित पोस्टर्स स्पर्धेत तंबाखू नियंत्रण कक्षाच्या डाटा ऑपरेटर प्रियांका लिंगडे यांना चौथ्या क्रमांकासाठी स्मृतीचिन्ह आणि प्रशस्तीपत्र मिळाले. तसेच चारुशिला कणसे आणि सामाजिक कार्यकर्त्या क्रांती शिंदे यांनाही प्रशस्तीपत्र मिळाले. निवासी उपजिल्हाधिकारी गलांडे यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले.