विनानंबर, नियमबाह्य ५२५ वाहनांवर कारवाईचा बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2021 02:24 PM2021-01-11T14:24:54+5:302021-01-11T14:27:31+5:30

विना नंबरप्लेट वाहने, नियमबाह्य नंबरप्लेट तसेच अर्धवट तुटलेल्या नंबरप्लेट लावणाऱ्या वाहनचालकांसह नियमबाह्य वाहनांवर रविवारी दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला.

Action against 525 unregistered vehicles | विनानंबर, नियमबाह्य ५२५ वाहनांवर कारवाईचा बडगा

विनानंबर, नियमबाह्य ५२५ वाहनांवर कारवाईचा बडगा

Next
ठळक मुद्देशहर वाहतूक शाखेची विशेष मोहीम दिवसात पावणेदोन लाखाहून अधिक दंड वसूल

कोल्हापूर : विना नंबरप्लेट वाहने, नियमबाह्य नंबरप्लेट तसेच अर्धवट तुटलेल्या नंबरप्लेट लावणाऱ्या वाहनचालकांसह नियमबाह्य वाहनांवर रविवारी दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला.

अवघ्या एका दिवसात तब्बल ५२५ वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यातून सुमारे पावणेदोन लाखाहून अधिक दंड वसूल करण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या आदेशानुसार शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने ही विशेष मोहीम राबवण्यात आली.

कोल्हापूर शहरात शनिवार, रविवार या सुट्टीच्या दिवशी नागरिकांची खरेदीसाठी मोठी गर्दी होते तसेच पर्यटकांचीही गर्दी वाढते. याचा फायदा घेत चेनस्नॅचिंग, पर्स चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. प्रामुख्याने या गुन्ह्यात विनानंबर अथवा नंबरप्लेट अर्धवट असलेल्या दुचाकीस्वार चोरट्यांचा सहभाग असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली. त्यानुसार विनानंबर प्लेट, नियमबाह्य नंबरप्लेट, अर्धवट तुटलेल्या नंबरप्लेट अगर नंबर प्लेटवरच नंबरमध्ये खाडाखोड केलेल्या वाहनांवर लक्ष्य करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी दिले. त्या

नुसार रविवारी दिवसभर शहरात शहर वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी यांच्या पथकाने विशेष मोहीम राबवत अशा संशयास्पद वाहनांची कसून तपासणी केली, त्यातून तब्बल ५२५ वाहनांवर कारवाई करत त्यांच्याकडून सुमारे १ लाख ७८ हजार ६०० रुपये दंड वसूल करण्यात आला.

कारण : वाहने संख्या - दंड

१) विनानंबर, तुटलेली नंबर प्लेट : १८१ - ३६,२००
२) विना लायसन्स : १०० -२०,०००
३) वनवे तोडणे : ५६-११,२००
४) पोलीस इशारा न जुमानणे : ९६-१९,२००
५) अतिवेगाने वाहन चालवणे : ९२-९२,०००

Web Title: Action against 525 unregistered vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.