वारंवार बाहेर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई :आयुक्तांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 02:59 PM2020-02-11T14:59:31+5:302020-02-11T15:03:02+5:30
महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी शाहू क्लॉथ मार्केट येथील के. एम. टी. कार्यालय, रेकॉर्ड विभाग, घरफाळा विभाग व नागरी सुविधा (सी.एफ.सी.) केंद्राची पाहणी केली. महापालिकेच्या सर्व विभागांतील कर्मचाºयांना वारंवार बाहेर जाऊ नये, जायचे झाल्यास नोंदवहीत नोंद करूनच जावे अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
कोल्हापूर : महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी शाहू क्लॉथ मार्केट येथील के. एम. टी. कार्यालय, रेकॉर्ड विभाग, घरफाळा विभाग व नागरी सुविधा (सी.एफ.सी.) केंद्राची पाहणी केली. महापालिकेच्या सर्व विभागांतील कर्मचाऱ्यांना वारंवार बाहेर जाऊ नये, जायचे झाल्यास नोंदवहीत नोंद करूनच जावे अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
रेकॉर्ड व सी. एफ. सी. सेंटरकडील कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी दाखल्यासाठी व रेकॉर्डसाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांशी सौजन्याने वागावे, नमस्कार करून स्वागत त्यांचे करावे, त्यांना आवश्यक ते दाखले अथवा रेकॉर्ड कसे जागेवर तत्काळ देता येतील याबाबत काळजी घ्यावी, अशा सूचना दिल्या.
तसेच के.एम.टी. कडील चालक व वाहक यांनी बसमध्ये येणाऱ्या सर्व प्रवाशांचे नमस्कार करून स्वागत करावे, त्यांना चांगली सेवा उपलब्ध करून द्यावी, के.एम.टी.चे उत्पन्न वाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, अशा सूचना दिल्या.
सकाळी आयुक्तकलशेट्टी यांनी खाते प्रमुखांच्या आढावा बैठकीमध्ये सर्व खाते प्रमुखांनी त्यांचे अधिनस्त कर्मचारी वेळेवर हजर राहतात का नाहीत ते पाहावे. दर महिन्याची हजेरी आस्थापना विभागाकडे पाठविण्यापूर्वी आपले अधिनस्त सर्व कर्मचारी सकाळी दहा वाजेपर्यंत हजर आहेत का, हे तपासावे.
या वेळेनंतर आलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशा सूचना दिल्या. कर्मचारी वांरवार आॅफिसच्या बाहेर जाता कामा नयेत, जायचे झालेस नोंद वहीमध्ये कोणत्या कामासाठी जाणार याची नोंद ठेवावी, असे सांगितले. यावेळी शहर अभियंता नेत्रदीपक सरनोबत, उपशहर अभियंता बाबूराव दबडे व रेकॉर्ड, के.एम.टी. विभागाकडील कर्मचारी उपस्थित होते.