७२ जणांवर होणार कारवाई

By admin | Published: December 24, 2014 10:16 PM2014-12-24T22:16:28+5:302014-12-25T00:07:51+5:30

देऊर सोसायटी अपहार प्रकरण : शासकीय लेखा परीक्षकांची माहिती

Action to be done on 72 people | ७२ जणांवर होणार कारवाई

७२ जणांवर होणार कारवाई

Next

वाठार स्टेशन : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिपत्याखालील जिल्ह्यातील आतापर्यंतच्या अपहारांचे रेकॉर्ड ब्रेक करणाऱ्या देऊर विकास सेवा सोसायटीतील करोडोंच्या अपहारप्रकरणी सचिवासह संचालक मंडळ, जिल्हा बँक विकास अधिकारी, लेखापरीक्षक व दुबार कर्जातील शेतकरी-सभासद अशा एकूण ७५ जणांविरोधात लवकरच कारवाई करणार असल्याची माहिती शासकीय लेखापरीक्षक कणसे यांनी दिली आहे.
‘देऊर विकास सेवा सोसायटीत करोडोंचा अपहार’ हे वृत्त सर्वप्रथम ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर या सोसायटीतील भ्रष्टाचाराचे भांडार जाहीर झाले. या अपहारातील मुख्य आरोपी असलेल्या सचिवाबाबत कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली. प्राथमिक स्वरूपात विजय साबळे या लेखापरीक्षकांनी चार लाखांपर्यंत अपहार झाल्याचा अहवाल सादर केला; परंतु विद्यमान संचालकांनी हा अपहार असल्याचा संशय व्यक्त करीत मागील काही वर्षांतील अपहार तपासण्याचे आदेश साबळे यांना दिले.
मात्र, साबळे यांनी जिल्हा उपनिबंधकांची परवानगी न घेतल्याने त्यांचा अहवाल ग्राह्य धरता येत नसल्याने या सेवा सोसायटीच्या फेरलेखा परीक्षणासाठी कणसे यांची नियुक्ती करण्यात आली. आनंदराव कणसे यांनी या प्रकरणाची सखोल तपासणी करत १ एप्रिल २००८ ते २३ आॅक्टोबर २०१३ या वर्षांच्या कालावधीत जवळपास दोन कोटी ७३ लाख अपहार असल्याचा अंदाज व्यक्त केला. या दरम्यान ग्रामस्थ, सभासद शेतकऱ्यांनी सचिवांबाबत संताप व्यक्त करत सचिवांच्या घरावर मोर्चा काढला. यातून सचिवांची गावातील वडिलार्जित शेती देऊन शेतकऱ्यांवरील कर्ज भरण्याबाबतचा निर्णय घेतला व त्यानुसार कारवाई झाली.
गावातील काही राजकीय विरोधकांनी या प्रक्रियेत अडथळा आणल्याने सचिवांची प्रॉपर्टी अडकून राहिली. परिणामी आता ज्या शेतकरी सभासदांनी दुबार कर्जे काढली. त्यांच्याच नावे ही कर्जे पडल्याने व त्यांनी लेखापरीक्षक कणसे यांना दिलेल्या अपुऱ्या कागदपत्रांमुळे आता हे शेतकरी अडचणीत आले आहेत. यामुळे या शेतकऱ्यांबाबतही कारवाई अटळ आहे, असेही मणसे यांनी सांगितले. (वार्ताहर)७२ जणांवर होणार कारवाई

गावातील काही राजकीय विरोधकांनी या प्रक्रियेत अडथळा आणल्याने सचिवांची प्रॉपर्टी अडकून राहिली. परिणामी आता ज्या शेतकरी सभासदांनी दुबार कर्जे काढली. त्यांच्याच नावे ही कर्जे पडल्याने व त्यांनी लेखापरीक्षक कणसे यांना दिलेल्या अपुऱ्या कागदपत्रांमुळे आता हे शेतकरी अडचणीत आले आहेत. यामुळे या शेतकऱ्यांबाबतही कारवाई अटळ आहे, असेही मणसे यांनी सांगितले. (वार्ताहर)

शंभर टक्के वसुलीसाठी दुबार कर्जे
नाबार्ड पुरस्कारासाठी जिल्हा बँक प्रत्येक सेवा सोसायटी सचिवाला सक्तीने शंभर टक्के वसुलीबाबत आदेश देते. देऊरमध्ये २०११-१२ मध्ये ४३ लाख व २०१२-१३ मध्ये ४० लाख रकमेचा बँकेत भरणा न करताच दुबार प्रकरण करण्याचे काम जिल्हा बँकेच्या विकास अधिकाऱ्यांनी केल्यानेच या सोसायटीमध्ये अपहाराचा डंका वाजल्याची चर्चा आहे.
दहिगाव विकास सेवा सोसायटीचे फेर लेखापरीक्षण आनंदराव कणसे यांच्याकडे असून, २०११-१२ चे फेर लेखापरीक्षण पूर्ण झाले; परंतु त्याचे दफ्तर वाठार पोलीस स्टेशनला जप्त असल्याने पुढील कालावधीचे दफ्तर अपूर्ण आहे. हे दफ्तर ताब्यात मिळाल्यास ते प्रकरण तडीस जाईल.

यांच्यावर होणार कारवाई
एक सचिव, दोन विकास अधिकारी
१७ तत्कालीन संचालक
१३ विद्यमान संचालक
३९ दुबार कर्जदार

Web Title: Action to be done on 72 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.