औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई

By admin | Published: April 26, 2015 10:44 PM2015-04-26T22:44:56+5:302015-04-27T00:11:16+5:30

गिरीश बापट : मिरजेत जनता मेडिकलच्या इमारतीचे उद्घाटन

Action on black market drug makers | औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई

औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई

Next

मिरज : औषधांचा काळाबाजार, जादा दराने विक्री, मुदतबाह्य औषधांची विक्री, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे विक्री करणाऱ्यांवर राज्यात कठोर कारवाई करण्यात येईल. महागड्या औषधांना पर्याय म्हणून स्वस्त जेनेरिक औषधे उपलब्ध करण्यात येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले.मिरजेत जनता मेडिकल स्टोअर्सच्या नूतन इमारतीचे उद्घाटन मंत्री गिरीश बापट व संभाजीराव भिडे गुरुजींच्याहस्ते झाले. औषधांचा संबंध मानवी जिवाशी असल्याने या व्यवसायात सचोटी असलीच पाहिजे, असे मंत्री बापट यांनी सांगितले. सचोटीने औषध व्यवसाय करणाऱ्या औषध विक्रेत्यांना शासन सहकार्य करेल. त्यांच्या अडचणी दूर करू, मात्र काळ्या बाजारासह अन्य गैरप्रकार करणाऱ्या विक्रेत्यांना मानवी जिवाशी खेळू दिले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.खासदार संजय पाटील, संभाजीराव भिडे यांनीही जनता मेडिकल स्टोअर्सचे संचालक शीतलनाथ पाटील व कोमलनाथ पाटील यांना शुभेच्छा दिल्या. आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, माजी आमदार गजेंद्र ऐनापुरे, भाजप जिल्हाध्यक्ष राजाराम गरूड, प्रकाश बिरजे, मकरंद देशपांडे, दीपक शिंदे, गजेंद्र कुल्लोळी, धनपाल खोत, क्रांतिनाथ पाटील, प्रकाश शेडबाळे, विनोद कोकाटे यांच्यासह सांगली-मिरज परिसरात औषध विक्रेते, राजकीय, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. शीतलनाथ पाटील यांनी प्रास्ताविक केले. सौ. सविता पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर)


जेनेरिक औषधे उपलब्ध करून देणार
काही विक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणावर औषधांचा काळाबाजार करण्यात येतो, ग्राहकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन जादा दराने औषधांची विक्री केली जाते. औषधे चुकीची व डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पुरविल्यास रुग्णांच्या जीवाचे बरेवाईट होऊ शकते. यामुळे राज्य सरकारने अशा विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याचे ठरविले आहे. अनेक कंपन्यांकडून चढ्या दराने औषधांची विक्री केली जाते. यामुळे राज्य सरकार अशा औषधांना पर्याय म्हणून अशी जेनेरिक औषधे उपलब्ध करून देणार असल्याचे यावेळी मंत्री गिरीश बापट यांनी सांगितले.

Web Title: Action on black market drug makers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.