कुरुंदवाडमध्ये कृती समितीकडून खड्डे बुजवा आंदोलन -खड्ड्यांत मुरूम टाकल्याने शहरवासीयांतून समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:24 AM2021-09-03T04:24:31+5:302021-09-03T04:24:31+5:30

दरम्यान, उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड यांनी दुपारी आंदोलकांची पालिका सभागृहात बैठक घेऊन शहरातील रस्त्यावरील खड्डे आज शुक्रवारपासून भरण्यात येतील. तसेच ...

Action committee in Kurundwad agitates to fill the pits - Satisfaction from city dwellers | कुरुंदवाडमध्ये कृती समितीकडून खड्डे बुजवा आंदोलन -खड्ड्यांत मुरूम टाकल्याने शहरवासीयांतून समाधान

कुरुंदवाडमध्ये कृती समितीकडून खड्डे बुजवा आंदोलन -खड्ड्यांत मुरूम टाकल्याने शहरवासीयांतून समाधान

Next

दरम्यान, उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड यांनी दुपारी आंदोलकांची पालिका सभागृहात बैठक घेऊन शहरातील रस्त्यावरील खड्डे आज शुक्रवारपासून भरण्यात येतील. तसेच १५ सप्टेंबरपासून रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येईल, असे लेखी आश्वासन देऊन रस्त्यासाठीचे सोमवार (दि. ७) रोजीचे भीक मागो आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. या वेळी नगरसेवक उपस्थित होते.

वारंवार आंदोलन व रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करूनही पालिका प्रशासन दखल घेत नसल्याने समिती पदाधिकाऱ्यांनी शिवतीर्थ मार्गावरील रस्त्यातील खड्डे मुरुमाने बुजवून अभिनव पद्धतीने आंदोलन केले. या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. मुरुमाने ते बुजविल्याने प्रवासी व शहरवासीयांतून समाधान व्यक्त होत आहे.

आंदोलनात बबलू पवार, आयुब पट्टेकरी, राजू घारे, अजित भोसले, रियाज शेख, अमित आवळे, हारुन म्हतापे, शब्बीर बागवान आदी सहभागी झाले होते.

फोटो - ०२०९२०२१-जेएवाय-०२

फोटो ओळ - कुरुंदवाड येथील शिवतीर्थ मार्गावरील खड्डे शहर बचाव कृती समितीने बुजवून अभिनव पद्धतीने आंदोलन केले. यावेळी राजू आवळे, सुनील कुरुंदवाडे, राजू घारे उपस्थित होते.

Web Title: Action committee in Kurundwad agitates to fill the pits - Satisfaction from city dwellers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.