गडहिंग्लजला रिंगरोडसाठी कृती समिती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2021 07:18 PM2021-01-29T19:18:07+5:302021-01-29T19:20:04+5:30

border dispute Gadhingalj Kolhapur- गडहिंग्लज शहरातील रखडलेला रिंगरोडचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी रिंगरोड कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला. हद्दवाढ मंजुरीप्रमाणे गडहिंग्लजच्या रखडलेल्या रिंग रोडचा प्रश्न सोडविण्याचा एकजुटीने प्रयत्न करण्याचा निर्णय सर्वपक्षीय बैठकीत आज, शुक्रवारी झाला.

Action Committee for Ring Road to Gadhinglaj! | गडहिंग्लजला रिंगरोडसाठी कृती समिती!

गडहिंग्लज येथील सर्वपक्षीय बैठकीत डॉ.एम. एस. बेळगुद्री यांनी मार्गदर्शन केले.यावेळी किसनराव कुराडे, किरण कदम, बसवराज खाणगावे,सुनील शिंत्रे आदी उपस्थित होते.

googlenewsNext
ठळक मुद्देगडहिंग्लजला रिंगरोडसाठी कृती समिती!सर्वपक्षीय बैठकीत निर्णय : लोकसहभागातून प्रश्न मार्गी लावणार

गडहिंग्लज : गडहिंग्लज शहरातील रखडलेला रिंगरोडचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी रिंगरोड कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला. हद्दवाढ मंजुरीप्रमाणे गडहिंग्लजच्या रखडलेल्या रिंग रोडचा प्रश्न सोडविण्याचा एकजुटीने प्रयत्न करण्याचा निर्णय सर्वपक्षीय बैठकीत आज, शुक्रवारी झाला.

येथील यशवंत बझारमध्ये ही बैठक झाली.अध्यक्षस्थानी किसनराव कुराडे होते. हद्दवाढ कृती समितीचे अध्यक्ष डॉ.एम.एस.बेळगुद्री यांची प्रमुख उपस्थिती होती.

कुराडे म्हणाले, लोक सहभाग आणि कृती समितीच्या माध्यमातूनच रिंगरोडचा प्रश्न मार्गी लागेल. बेळगुद्री म्हणाले, एडीडीपीआरच्या चुकांमुळेच अनेक ठिकाणी वाद व गुंता निर्माण झाला आहे. भुसंपादनासाठी संबंधित शेतकरी व नागरिकांचीही व्यापक बैठक घ्यावी लागेल.

किरण कदम म्हणाले, सद्या ताब्यात असणार्‍या रस्त्याचा विकास तातडीने करायला हवा. भरपाई आणि पर्यायी जागा याची माहिती संबंधित शेतकर्‍यांना द्यावी. नगरसेवक बसवराज खणगावे व नरेंद्र भद्रापूर यांनी याकामी नगरपालिकेचे सर्वतोपरी सहकार्य राहील असे सांगितले.

चर्चेत बसवराज आजरी, नागेश चौगुले, रश्मीराज देसाई, अशोक खोत यांनीही भाग घेतला. बैठकीस रमेश रिंगणे, रमजान अत्तार, महेश सलवादे, विरुपाक्ष पाटणे, विश्वास खोत, बाळासाहेब सुतार, राजकुमार कदम, सुमित धाकोजी, सचिन पाटील आदी उपस्थित होते. सुनिल शिंत्रे यांनी प्रास्ताविक केले. दिलीप माने यांनी आभार मानले.


 

Web Title: Action Committee for Ring Road to Gadhinglaj!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.