कृती समिती आजपासून
By admin | Published: September 14, 2015 12:17 AM2015-09-14T00:17:54+5:302015-09-14T00:18:08+5:30
सर्किट बेंचचा प्रश्न : हायकोर्टाच्या ६५ न्यायमूर्तींनाही भेटणार
कोल्हापूर : उच्च न्यायालयाचे ‘सर्किट बेंच’ कोल्हापुरात स्थापन होत नाही तोपर्यंत ‘आर-पार’ची लढाई करण्याचा निर्धार सहा जिल्ह्यांतील वकिलांनी रविवारी खंडपीठ कृती समितीच्या बैठकीत केला. वकील, पक्षकार यांना विश्वासात घेऊन आंदोलन तीव्र करण्यासाठी आज, सोमवारपासून सहा जिल्ह्णांतील ६८ तालुक्यांचा दौरा करण्याचा निर्णयही घेण्यात आला.
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सप्टेंबरअखेर रूजू होतील त्यानंतर पुन्हा बैठक घेऊन ‘बेमुदत काम बंद’चा निर्णय घेतला जावा, अशी भूमिका कृती समितीचे निमंत्रक अॅड. राजेंद्र चव्हाण यांनी मांडली. त्यास सर्वांनी पाठिंबा दिला. न्या. शहा यांनी फुल्ल हाऊसच्या बैठकीत ‘सर्किट बेंच’ची फाईल ठेवली आहे. उपस्थित उच्च न्यायालयाचे ४५, औरंगाबाद व नागपूर खंडपीठाचे २० अशा ६५ न्यायाधीशांना या मागणीसंदर्भात आपले मत देऊन नवीन रूजू होणाऱ्या मुख्य न्यायाधीशांसमोर ही फाईल ठेवावी, असे त्यांनी मत व्यक्त केल्याचे समजते आहे. न्या. शहा यांनी घेतलेल्या निर्णयाची कागदपत्रे माहिती अधिकारद्वारे प्राप्त केली जाणार आहेत तसेच सर्व न्यायमूर्तींची वैयक्तिक भेट घेऊन ‘सर्किट बेंच’ स्थापनेसाठी विनंती करण्यात येणार आहे.