शिवाजी रोड, बाजारगेट परिसरांत धोकादायक इमारतींवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:28 AM2021-08-19T04:28:18+5:302021-08-19T04:28:18+5:30
कोल्हापूर : शहरातील शिवाजी रोड व बाजारगेट परिसरात असलेल्या दोन इमारतींचा धोकादायक भाग बुधवारी जेसीबीच्या साहाय्याने उतरविण्यात आला. ही ...
कोल्हापूर : शहरातील शिवाजी रोड व बाजारगेट परिसरात असलेल्या दोन इमारतींचा धोकादायक भाग बुधवारी जेसीबीच्या साहाय्याने उतरविण्यात आला. ही कारवाई महापालिकेच्या शिवाजी मार्केट विभागीय कार्यालयातर्फे करण्यात आली.
शिवाजी रोडवरील मधुकर देवगांवकर, अनीस महंमद गजनी भालदार तर डी वॉर्ड बाजारगेट येथील सुनील विठ्ठलराव हावळ, अनिल बाळकृष्ण हावळ यांच्या मिळकतींचे दर्शनी भाग अत्यंत धोकादायक अवस्थेत होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून महापालिकेच्या प्रशासनाकडून खबरदारी म्हणून महापालिका प्रशासनाने संबंधित मालकांना नोटिसा बजावल्या होत्या. मात्र संबंधितांनी आपल्या इमारतीचा धोकादायक भाग काढून घेतला नाही. तसेच महापालिकेच्या नोटिसीची दखल घेतलेली नाही. त्यामुळे बुधवारी शहरातील शिवाजी रोड व बाजार गेट परिसरातील सदर इमारतींचे धोकादायक भाग जेसीबीच्या साहाय्याने उतराविण्यात आले.
ही कारवाई शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत व उपशहर अभियंता नारायण भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ अभियंता प्रमोद बराले, निवास पोवार, सागर शिंदे, लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी, मुकादम राहुल जाधव, मोहन कांबळे, दिगंबर पाटील, सचिन जाधव व कर्मचारी यांनी केली.
फोटो क्रमांक - १८०८२०२१-कोल-केएमसी
ओळ - कोल्हापूर शहरातील शिवाजी रोड, बाजारगेट परिसरांतील इमारतींचे धोकादायक भाग मंगळवारी महापालिका प्रशासनाने उतरविले.