यात्रेत हयगय झाल्यास खातेप्रमुखावरच कारवाई

By admin | Published: April 30, 2015 12:38 AM2015-04-30T00:38:14+5:302015-04-30T00:43:03+5:30

जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा : गडहिंग्लजच्या महालक्ष्मी यात्रेसाठी बैठक

Action on the head of the account if the pilgrims are injured | यात्रेत हयगय झाल्यास खातेप्रमुखावरच कारवाई

यात्रेत हयगय झाल्यास खातेप्रमुखावरच कारवाई

Next

गडहिंग्लज : एखाद्या विभागाच्या कर्तव्यात हयगय झाल्यामुळे अनर्थाचा प्रसंग उद्भवल्यास संबंधित खातेप्रमुखावरच कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी बुधवारी दिला.मे च्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या येथील श्री महालक्ष्मी यात्रा तयारी आढाव्याच्या अंतिम बैठकीत ते बोलत होते. जिल्हापोलीसप्रमुख डॉ. मनोजकुमार शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी म्हणाले, महसूल, पोलीस, नगरपालिका व यात्रा समितीने नियोजनपूर्वक तयारी केल्यामुळे यात्रा निश्चितच यशस्वी होईल. मात्र, स्थानिक युवक मंडळांसह सेवाभावी संस्थांची मदत घेतल्यास यात्रेच्या यशस्वीतेसाठी मोठा हातभार लागेल.
जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. शर्मा म्हणाले, सर्वांनी महिनाभर मेहनत घेऊन यात्रेची खूप चांगली तयारी केली आहे. कितीही तयारी केली तरी काही उणिवा राहतात. चांगले-वाईट काहीही झाले तरी जबाबदारी सर्वांचीच आहे. शेवटी माणूस म्हटल्यानंतर एखादी चूक होणारच. मात्र, त्याचा मुद्दा मोठा न करता यात्रा मोठी करा.
सहायक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी वैभवशाली गडहिंग्लज शहराच्या माहितीबरोबरच यात्रेच्या कृती आराखड्याबाबत सविस्तर माहिती दिली. तहसीलदार हनुमंत पाटील यांनी यात्रेच्या सर्वांगीण तयारीच्या नियोजनाचा आढावा घेतला.
मुख्याधिकारी तानाजी नरळे यांनी सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता आणि अग्निशमन व्यवस्था, तर पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांनी वाहतूक नियंत्रण व पार्किंग व्यवस्थेबद्दल प्रोजेक्टद्वारे माहिती दिली.नगराध्यक्षा लक्ष्मी घुगरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांचा, तर विरोधी पक्षनेत्या प्रा. स्वाती कोरी यांनी जिल्हा पोलीसप्रमुखांचा सत्कार केला. बैठकीस उपनगराध्यक्षा कावेरी चौगुले, डीवायएसपी सागर पाटील, भुदरगडच्या प्रांताधिकारी कीर्ती नलवडे, यात्रा समिती अध्यक्ष रमेश रिंगणे, गटविकास अधिकारी चंचल पाटील, कार्यकारी अभियंता धनंजय पाटणकर, उपस्थित होते.


पुष्पवृष्टीस परवानगी नाही : शर्मा
जिल्हा पोलीसप्रमुख मनोजकुमार शर्मा यांनी श्री महालक्ष्मी मंदिराच्या कळसावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टीस परवानगी नसल्याचे सांगितले. लक्ष्मी मिरवणूक व वाहतुकीकडे गांभीर्याने पहाण्याबरोबर सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था धोक्यात येईल, अशा गोष्टींना थारा देऊ नका, असे ते म्हणाले.


जिल्हाधिकारी म्हणाले...
यात्रा कालावधीत भारनियमन नको.
वीज गेल्यास जनरेटरची पर्यायी व्यवस्था करा, पथदिव्यांकडे लक्ष द्या.
शहरालगतच्या उपनगरांत पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या.
शहरात येणाऱ्या चारही रस्त्यांवर रुग्णवाहिका तैनात ठेवा.
अग्निशमन सेवा, रुग्णवाहिका व फिरत्या स्वच्छतागृहांची संख्या वाढवा

Web Title: Action on the head of the account if the pilgrims are injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.