उघड्यावर कचरा टाकल्यास कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:25 AM2021-09-03T04:25:55+5:302021-09-03T04:25:55+5:30
कोल्हापूर : सफाई कर्मचाऱ्यांनी प्रभागातील कचरा जाळू नये. आरोग्य निरीक्षकांनी कार्यक्षेत्रातील फेरीवाले व खाऊ विक्रेत्यांनी कचरा उघडयावर टाकू देऊ ...
कोल्हापूर : सफाई कर्मचाऱ्यांनी प्रभागातील कचरा जाळू नये. आरोग्य निरीक्षकांनी कार्यक्षेत्रातील फेरीवाले व खाऊ विक्रेत्यांनी कचरा उघडयावर टाकू देऊ नये. कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना उपआयुक्त निखिल मोरे यांनी गुरुवारी दिल्या.
आरोग्य घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील सर्व आरोग्य निरीक्षक, सहा आरोग्य निरीक्षक, मुकादम, ॲटो टिपर वाहनांवरील कर्मचारी, वाहनचालकांच्या कार्यशाळेत ते बोलत होते. केशवराव भोसले नाटयगृहात कार्यशाळा झाली.
मोरे म्हणाले, ॲटो टिपरद्वारे घराघरांत निर्माण होणारा कचरा वर्गीकृत स्वरूपात संकलन करण्यात यावा. सर्व मुकादमांनी प्रभागातील कर्मचाऱ्यांची नियमितपणे सकाळी ६.३० वाजेपर्यंत हजेरी घ्यावी. नागरिक उघडयावर कचरा टाकणार नाहीत याची दक्षता घ्यावी. कचरा घंटागाडी वाहनातून पूर्ण क्षमतेने संकलित करून प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्पस्थळी पाठवण्यात यावा. अवनि संस्थेस भाजीपाला मार्केटमधील दैनंदिन कचरा उठाव करून व्यावसायिक परिसरात स्वच्छता ठेवावी.
मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार म्हणाले, ॲटो टिपर वाहनांवरील कामकाज पूर्ण क्षमतेने होत की नाही, याची पाहणी सर्व वॉर्ड आरोग्य निरीक्षकांनी जीपीएस सिस्टिमद्वारे रोज करावी.
कार्यशाळेत माहिती शिक्षण व संवाद अधिकारी नीलेश पोतदार यांनी सूत्रसंचालन केले. सहा. आयुक्त संदीप घार्गे, विभागीय आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर, निखिल पाडळकर यांच्यासह सर्व आरोग्य निरीक्षक, सहा आरोग्य निरीक्षक, मुकादम, ॲटो टिपर वाहनावरील कर्मचारी व वाहनचालक उपस्थित होते.