‘निर्भया’चा २५० युवकांना दणका-- पंधरा दिवसांतील कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 12:40 AM2017-10-13T00:40:44+5:302017-10-13T00:45:05+5:30
कोल्हापूर : शहरातील शाळा, महाविद्यालये, बसस्टॉप, आदी परिसरात असभ्य वर्तनाबरोबरच युवतींची छेड काढणाºया
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शहरातील शाळा, महाविद्यालये, बसस्टॉप, आदी परिसरात असभ्य वर्तनाबरोबरच युवतींची छेड काढणाºया २५० युवकांवर निर्भया पथकाने गेल्या पंधरा दिवसांत कारवाई केली. कॉलेजला जातो, म्हणून घरातून बाहेर पडलेल्या मुलांचे पराक्रम पाहून पालकांना चिंता लागली आहे. रेकॉर्डवर येणाºया अशा तरुणांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात येणार आहे. त्यामुळे त्यांनी स्वत:ला वेळीच सावरावे, असे मत शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी व्यक्त केले.
‘निर्भया’ पथकाने विवेकानंद कॉलेज, शहाजी कॉलेज (दसरा चौक), महावीर कॉलेज (बस स्टॉप), कॉमर्स कॉलेज, बिंदू चौक, आझाद चौक, शाहू मैदान, खासबाग मैदान, मिरजकर तिकटी, विद्यापीठ हायस्कूल, भवानी मंडप, शिवाजी चौक बसस्टॉप, गंगावेश बसस्टॉप, के.एम.सी. कॉलेज, न्यू कॉलेज (परिसर), पद्माराजे गर्ल्स हायस्कूल, प्रिन्सेस इंदुमती गर्ल्स हायस्कूल चौक, भोई गल्ली, एन.सी.सी. भवन परिसर, शिवाजी विद्यापीठ परिसर, केआयटी कॉलेजकडे जाणारा रस्ता व भारती विद्यापीठ परिसर, रंकाळा परिसर, महावीर गार्डन यांसह कॉलेज परिसरातील पानटपरी, हॉटेल, आइस्क्रीम पार्लर, कँटीन, आदी ठिकाणी युवतींची छेड काढणे, अशा २५० युवकांना खाकीचा प्रसाद देत कारवाई केली. त्यांच्या कारवाईची चाहूल कोणालाच लागत नाही. छेडछाड करीत असल्याचे व्हिडिओ शूटिंग करून त्याला पकडले जाते.
जिल्ह्यात दहा पथके
युवती व महिलांच्या सुरक्षेसाठी जिल्ह्यात दि.८ आॅगस्ट २०१६ रोजी ‘निर्भया’ पथकाचा प्रारंभ करण्यात आला. जिल्ह्यांमध्ये दहा पथके तैनात करण्यात आली आहेत. या पथकांना स्वतंत्र ड्रेसकोड व दिमतीला वेगवान दुचाकी दिल्या आहेत. या निर्भया पथकामुळे आम्ही घराबाहेर पडल्यानंतर परत घरी येईपर्यंत सुरक्षित आहोत, अशा प्रतिक्रिया युवतींनी व्यक्त केल्याचे मत डॉ. अमृतकर यांनी व्यक्त केले.
अशी होते कारवाई
सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन व छेडछाड करणाºयांवर महाराष्टÑ पोलीस अॅक्ट ११०/११७ नुसार प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते. या कलमाखाली कारवाई होणाºया तरुणांची पोलीस रेकॉर्डला नोंद होऊन त्यांच्या हालचालींवर नेहमी पथक लक्ष ठेवते.