दोन हजारांवर वाहनांवर कारवाई; साडेतीन लाख रुपये दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:17 AM2021-06-23T04:17:26+5:302021-06-23T04:17:26+5:30

कोल्हापूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घातलेल्या निर्बंधांचे उल्लंघन करणा-या सुमारे २०२६ वाहनांवर कारवाई करून त्यांच्याकडून सुमारे साडेतीन ...

Action on over two thousand vehicles; A fine of Rs 3.5 lakh was recovered | दोन हजारांवर वाहनांवर कारवाई; साडेतीन लाख रुपये दंड वसूल

दोन हजारांवर वाहनांवर कारवाई; साडेतीन लाख रुपये दंड वसूल

Next

कोल्हापूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घातलेल्या निर्बंधांचे उल्लंघन करणा-या सुमारे २०२६ वाहनांवर कारवाई करून त्यांच्याकडून सुमारे साडेतीन लाख रुपये दंड वसूल केला. ही कारवाई मंगळवारी कोल्हापूर पोलीस दलाच्यावतीने करण्यात आली.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने घातलेल्या निर्बंधांचे उल्लंघन करणा-यांवर कोल्हापूर पोलीस दलाच्यावतीने कारवाई करण्यात येत आहे. मंगळवारी विनामास्क फिरणा-या २१८६ जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून ३ लाख ४३ हजार ४०० रुपये दंड वसूल करण्यात आला. त्याशिवाय मोटर वाहन कायद्यान्वये उल्लंघन करणा-या १६६६ वाहनांवर गुन्हे नोंदवण्यात आले, त्यांच्याकडून ३ लाख ५० हजार ८०० रुपये दंड वसूल केला. तसेच विनाकारण फिरणारी ३६० दुचाकी वाहने जप्त करण्यात आली. १२७ आस्थापनांवर कारवाई करत त्यांच्याकडून ९० हजार ८०० रुपये दंड वसूल केला.

Web Title: Action on over two thousand vehicles; A fine of Rs 3.5 lakh was recovered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.