पुराचा सामना करावा लागू नये यासाठी कृती आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:25 AM2021-08-15T04:25:08+5:302021-08-15T04:25:08+5:30

कोल्हापूर : जिल्ह्यातील पूरबाधित नागरिकांना यापुढे पुराला सामोरे जावे लागू नये, यासाठी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून उपाययोजना राबविण्यासाठीचा ...

Action plan to avoid flooding | पुराचा सामना करावा लागू नये यासाठी कृती आराखडा

पुराचा सामना करावा लागू नये यासाठी कृती आराखडा

Next

कोल्हापूर : जिल्ह्यातील पूरबाधित नागरिकांना यापुढे पुराला सामोरे जावे लागू नये, यासाठी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून उपाययोजना राबविण्यासाठीचा कृती आराखडा तयार करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी शनिवारी दिली. करवीर तालुक्यातील वळीवडे, चिंचवाड, वसगडे या पूरबाधित गावांच्या पाहणी दरम्यान त्यांनी नागरिकांच्या अडचणी समजून घेतल्या.

मंत्री पाटील यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी प्रत्यक्ष बांधावर जाऊन केली. वळीवडे येथील ऊसशेतीच्या नुकसानीची पाहणी ट्रॅक्टरमधून केली. यावेळी आमदार ऋतुराज पाटील, करवीर प्रांताधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार शितल मुळे-भामरे, गटविकास अधिकारी जयवंत उगले, पंचायत समिती सभापती मंगल पाटील, गावचे सरपंच, ग्रामसेवक, पूरबाधित नागरिक उपस्थित होते.

यावेळी नागरिकांनी वळीवडे, चिंचवाड भागातून रेल्वे मार्ग जात असून याखालील भरावामुळे नदीचे पाणी अडवले जाऊन हे पाणी शेतात पसरते. त्यामुळे रेल्वे मार्ग उंचावर करून कमानी कराव्यात, त्यामुळे प्रवाहाला अडथळा होणार नाही. पंचगंगा नदी व ओढ्यावरील पुलाखालील भराव काढून कमानी कराव्यात, अतिक्रमणे काढावीत अशी मागणी केली.

यावेळी मंत्री पाटील यांनी पुरामुळे करवीर व हातकणंगले तालुक्यातील नागरिकांचे व शेतीचे नुकसान होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्याबाबत रेल्वे विभागासह संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन दिले. अधिकाऱ्यांना नुकसानीचे सरसकट पंचनामे करा. पंचनामे जलदगतीने करा, जेणेकरून मदत वेळेत पोहोचविता येईल. पूरबाधित कोणताही नागरिक मदतीपासून वंचित राहता कामा नये, याची दक्षता घ्या, अशा सूचना केल्या.

----

वळीवडेत ३५० हेक्टरचे नुकसान

वळीवडे गावातील सुमारे ३५० हेक्टर तर चिंचवाडमधील ३२५ हेक्टर क्षेत्रावरील शेतीचे नुकसान झाले असून पंचनामे लवकरच पूर्ण होतील, असे तहसीलदार शितल मुळे यांनी सांगितले.

---

रुई-इंगळी बंधाऱ्याची पाहणी

करवीरनंतर मंत्री पाटील यांनी रुई-इंगळी बंधाऱ्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी पूरबाधितांचे पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून यासाठी ग्रामस्थांनीही सहकार्य करावे. रुई-इंगळी बंधाऱ्याबरोबरच नदी, ओढ्यावरील भरावामुळे नदीच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी उपाययोजना करणे, ओढ्यावरील व नदीपात्रातील अतिक्रमणे काढणे, गाळ काढणे, गावांचे पुनर्वसन करणे, पूररेषा निश्चित करून नद्यांचे रुंदीकरण या उपाययोजना करणे आवश्यक असून याबाबत बैठकीत चर्चा करण्यात येईल, असे सांगितले. यावेळी आमदार राजूबाबा आवळे, माजी खासदार निवेदिता माने, माजी आमदार सुजित मिणचेकर, माजी आमदार राजीव आवळे, मुरलीधर जाधव, तहसीलदार शरद पाटील उपस्थित होते.

---

फोटो नं १४०८२०२१-कोल-सतेज पाटील पाहणी०१

ओळ : कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी शनिवारी करवीर तालुक्यातील वळीवडे, चिंचवाड, वसगडे या पूरबाधित गावांची पाहणी केली.

---

०२ यावेळी त्यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.

---

Web Title: Action plan to avoid flooding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.