तळसंदेत वेश्या व्यवसायावर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:25 AM2020-12-22T04:25:06+5:302020-12-22T04:25:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पेठवडगाव : तळसंदेत (ता.हातकणंगले) येथील हाॅटेल जोतिबा येथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याच्या संशयावरून पोलिसांनी छापा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पेठवडगाव : तळसंदेत (ता.हातकणंगले) येथील हाॅटेल जोतिबा येथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याच्या संशयावरून पोलिसांनी छापा टाकला. त्यामध्ये मॅनेजर, एजंटसह पीडित महिलेवर पोलिसांनी कारवाई केली. ही कारवाई रविवारी रात्री अकराच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी मॅनेजर संतोष तुकाराम पाटील (वय ३१, रा. भुदरगड), एजंट संतोष नामदेव भोसले (रा. बहिरेवाडी, ता. पन्हाळा) अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत तर पीडित महिलेलेला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. ही कारवाई वडगाव पोलिसांच्यावतीने प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी डॉ. बी. धीरजकुमार यांच्या पथकाने केली. याबाबत फिर्याद पोलीस नाईक अमर पावरा यांनी दिली.
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, वाठार-तळसंदे रस्त्यावरील हॉटेल जोतिबा येथे रूमनंबर दोनमध्ये वेश्या व्यवसाय सुरू होता. त्यानुसार पोलिसांनी काल रविवारी रात्री छापा टाकला. यामध्ये डमी ग्राहक ही पाठविले होते. येथे संगनमताने वेश्या व्यवसाय करत असल्याची माहिती प्रक्षिणार्थी पोलीस अधिकारी धीरजकुमार बच्चू यांना मिळाली होती.
त्यानुसार या पथकाने छापा टाकला. यामध्ये वेश्या व्यवसाय एजंट भोसले, मॅनेजर पाटील यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या कारवाईत चार मोबाईल, हजार रुपयासह अन्य १२ हजार ३०० रुपयांसह साहित्य जप्त करण्यात आले आहेत. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार करत आहेत. ही कारवाई स्नेहल पडवळे, प्रियांका पाटील, रणवीर जाधव आदींनी केली.