वडगावात बेकायदेशीर कत्तलखान्यावर कारवाई करावी : हिंदुत्ववादी संघटनांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:31 AM2021-09-16T04:31:26+5:302021-09-16T04:31:26+5:30

येथील बेपारी वसाहतीत कत्तलखान्यात देशी गाई आणण्यात आल्या होत्या. गोवंश हत्या कायदा लागू असताना विनापरवाना ...

Action should be taken against illegal slaughterhouses in Wadgaon: Demand of pro-Hindu organizations | वडगावात बेकायदेशीर कत्तलखान्यावर कारवाई करावी : हिंदुत्ववादी संघटनांची मागणी

वडगावात बेकायदेशीर कत्तलखान्यावर कारवाई करावी : हिंदुत्ववादी संघटनांची मागणी

Next

येथील बेपारी वसाहतीत कत्तलखान्यात देशी गाई आणण्यात आल्या होत्या. गोवंश हत्या कायदा लागू असताना विनापरवाना कत्तलखान्यात गाईंची हत्या करून मांसाची विक्री करण्यात येत होती. यावेळी सर्व हिन्दुत्ववादी कार्यकर्त्यांनी अचानक भेट दिली असता, त्याठिकाणी जिवंत तीन गाई, बैल, बछडे मिळाले. लहान बछड्यांचे मांस सापडले, गोडावूनमध्ये दोन टन व आयशर टेम्पोत पाच टन गाईचे मांस मिळाले आहे. याठिकाणी कत्तल करताना तीन कामगार होते. यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी बारा मालकांची नावे सांगितली आहेत. या सर्वांविरोधात गोवंश हत्याबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल कऱण्याची मागणी हिन्दुत्ववादी संघटनेच्यावतीने प्रसिध्दीपत्रकातून केली आहे. या निवेदनावर अंकुश माने, सुनील माने, धनंजय गोंदकर, किरण पुरोहित, अनिल माने, किरण कोळी, प्रवीण माने, वैभव हिरवे, विकास कांबळे, सागर लोळगे, अक्षय माने यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Action should be taken against illegal slaughterhouses in Wadgaon: Demand of pro-Hindu organizations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.