अ‍ॅपेसह सहा आसनी रिक्षांवर कारवाईचा बडगा ; परवाना ग्रामीण चा अन् व्यवसाय शहरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 02:35 PM2018-11-28T14:35:33+5:302018-11-28T14:41:28+5:30

कोल्हापूर शहरात ग्रामीण प्रवासी वाहतुक करण्याचा परवाना असताना अवैध वाहतुक करणाºया अ‍ॅपेसह सहा आसनी रिक्षांवर आजपासून कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. त्यामुळे वाहतुक कोंडी

Action on Six Assault Routes with Apache; License in rural and urban areas | अ‍ॅपेसह सहा आसनी रिक्षांवर कारवाईचा बडगा ; परवाना ग्रामीण चा अन् व्यवसाय शहरात

अ‍ॅपेसह सहा आसनी रिक्षांवर कारवाईचा बडगा ; परवाना ग्रामीण चा अन् व्यवसाय शहरात

Next

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात ग्रामीण प्रवासी वाहतुक करण्याचा परवाना असताना अवैध वाहतुक करणाºया अ‍ॅपेसह सहा आसनी रिक्षांवर आजपासून कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. त्यामुळे वाहतुक कोंडी व अवैध प्रवासी वाहतुक यावर अंकुश येणार आहे.

प्रादेशिक परिवहन प्राधिकरणने सहा आसनी व अ‍ॅपे रिक्षांना नमुद केलेला मुळ तालुका व त्या लगतचे अन्य दोन तालुकांमध्ये आपले वाहन प्रवासी वाहतुक करण्यास परवानगी देते. मात्र, त्या ऐवजी अशी वाहने चक्क शहरातून प्रवासी वाहतुक करताना दिसत आहेत. त्यामुळे शहरातील वाहतुकीचे नियंत्रण बिघडण्यात झाले आहे. ही वाहने तासन्तास एकाच ठिकाणी प्रवाशी गोळा करण्यासाठी थांबून राहतात. त्यामुळे के.एम.टी. व अन्य वाहतुकीला अडथळा निर्माण होतो.

अशा अवैद्य थांब्यांमुळे एकूणच शहरातील वाहतुक नियंत्रणाचा बोजवारा उडाला आहे. ही बाब ध्यानी घेवून शहर वाहतुक शाखेने आज, गुरूवारपासून अशा ग्रामीण परवाना असलेल्या रिक्षांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. अशा अ‍ॅपेसह सहा आसनी रिक्षाचालकांवर कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल शहर वाहतुक शाखेतर्फे कडक कारवाई केली जाणार आहे. विशेषत: लुगडी ओळ, महाराणा प्रताप चौक, शिवाजी चौक, टाऊन हॉल मध्यवर्ती बसस्थानक, रंकाळा बसस्थानक, जनता बझार चौक, संभाजीनगर, दसरा चौक, दाभोळकर कॉर्नर, शारदा कॅफे चौक, अशा महत्वाच्या चौकात ही वाहने तासन्तास वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने उभी असतात. अशा वाहनांवर यापुर्वी न्यायालयात खटले भरण्यात आले होते. त्याप्रमाणे गुरूवारपासून कारवाई केली जाणार आहे.


लक्ष्मीपुरी धान्य बाजारातील अवजड मालवाहतुक करणाºया वाहनांकरीता ठराविक वेळेतच माल उतरवण्यासाठी मुभा देण्यात येणार आहे. त्या दृष्टीने येत्या आठ दिवसांत पुन्हा अशी सुचना काढली जाणार आहे. त्यामुुळेही काही प्रमाणात वाहतुक कोँडीला आळा बसणार ाहे. जिल्ह्यात तीनचाकी व सहा आसनी रिक्षा १६ हजार ९७६ , तर ग्रामीण प्रवासी वाहतुक करणारी २ हजार १४५ इतकी वाहने आहेत.

 

ग्रामीण परवाना असणाºया अ‍ॅपेसह सहा आसनी रिक्षाचालकांनी शहरातील वाहतुकीवर ताण येईल असे कृत्य करू नये. असे वाहन शहरात विना परवाना आल्यास त्याच्यावर कारवाई निश्चित केली जाईल. त्यामुळे परवाना ज्या क्षेत्रापुरता मर्यादित आहे, त्याच ठिकाणी आपण व्यवसाय करावा. यासह अवजड वाहतुकीबाबत कठोर कारवाई केली जाईल.
अनिल गुजर , पोलीस निरीक्षक

 

प्रादेशिक परिवहन प्राधिकरण ज्या नियमावलीनूसार अशा वाहनांना परवाना वितरीत करते.त्याप्रमाणे त्या वाहनमालकांनी त्याच क्षेत्रात प्रवासी वाहतुक करावी. नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल.   डॉ. एस.टी.अल्वारिस , उपप्रादेशिक परिवहन अधिकारी , कोल्हापूर

 

Web Title: Action on Six Assault Routes with Apache; License in rural and urban areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.