एसटीपी समवेलवर पंधरा दिवसांत दुसऱ्यांदा कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:26 AM2021-04-16T04:26:00+5:302021-04-16T04:26:00+5:30

इचलकरंजी : टाकवडे वेस परिसरातील एसटीपी समवेलवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी अचानक छापा टाकला. यावेळी पाण्याचे नमुने घेण्यात ...

Action on STP Samvel for the second time in fifteen days | एसटीपी समवेलवर पंधरा दिवसांत दुसऱ्यांदा कारवाई

एसटीपी समवेलवर पंधरा दिवसांत दुसऱ्यांदा कारवाई

Next

इचलकरंजी : टाकवडे वेस परिसरातील एसटीपी समवेलवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी अचानक छापा टाकला. यावेळी पाण्याचे नमुने घेण्यात आले असून, दोषी आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

काळ्या ओढ्यामध्ये एसटीपी समवेल प्रकल्पामधून प्रकिया न करता थेट पाणी ओढ्यात सोडण्यात येत आहे. अशा प्रकारच्या तक्रारी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे प्राप्त झालेल्या आहेत. त्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यानी प्रकल्पाची पाहणी केली. पाहणी केली असता, प्रकल्पामधून प्रकिया न करता थेट पाणी ओढ्यात सोडण्यात येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी पाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. शुक्रवारी (दि.९) अधिकाऱ्यांनी प्रकल्पाची पाहणी केली होती. ही कारवाई महाराष्ट्र प्रदूषण क्षेत्रीय अधिकारी सचिन हरबट, नीलेश मरबळ यांनी केली. यावेळी हायड्रोलीक इंजिनिअर बाजी कांबळे, पर्यावरण सदस्य संतोष हत्तीकर उपस्थित होते.

Web Title: Action on STP Samvel for the second time in fifteen days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.