संचारबंदीचा भंग करणाऱ्या १७ हॉटेलवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 11:51 AM2020-12-25T11:51:22+5:302020-12-25T12:06:55+5:30

Coronavirus Unlock Kolhapur Police - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या शहर व उपनगरांतील १७ हॉटेलवर कारवाई करण्यात आली. याशिवाय विनाकरण रस्त्यावर फिरणाऱ्या १०६ वाहनांसह सहा ओपन बारवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. शहर पोलीस उप-अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविली.

Action taken against 17 hotels violating curfew | संचारबंदीचा भंग करणाऱ्या १७ हॉटेलवर कारवाई

संचारबंदीचा भंग करणाऱ्या १७ हॉटेलवर कारवाई

Next
ठळक मुद्देसंचारबंदीचा भंग करणाऱ्या १७ हॉटेलवर कारवाई मोहीम तीव्र : शहरातील १०६ वाहनांवरही दंडाचा बडगा

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या शहर व उपनगरांतील १७ हॉटेलवर कारवाई करण्यात आली. याशिवाय विनाकरण रस्त्यावर फिरणाऱ्या १०६ वाहनांसह सहा ओपन बारवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. शहर पोलीस उप-अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविली.

रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यत संचारबंदी मंगळवारपासून पुकारली आहे. ही संचारबंदी १५ दिवस राहणार आहे. ‘अत्यावश्‍यक सेवा’वगळता सर्वच व्यवहार बंद ठेवावेत, नागरिकांनीही नाहक रस्त्यावर फिरू नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून केले होते; पण तरीही संचारबंदीची तमा न बाळगता आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. शहरातील चारही पोलीस ठाण्याचे किमान शंभराहून अधिक पोलीस रस्त्यावर बंदोबस्तासाठी आहेत.

दोन दिवसांत ३३१ वाहनांवर कारवाई

शहर वाहतूक नियंत्रण शाखेने वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्यांविरोधात पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी यांच्या नेतृत्वाखाली मोहीम सुरू केली आहे. बुधवार व गुरुवार दोन दिवशी नियमबाह्य नंबरप्लेट लावणाऱ्या १७८ वाहनचालक, कर्कश हॉर्नप्रकरणी ६६ वाहनांवर तर आसनक्षमतेचा भंग करणाऱ्या ७७ वाहनांवर कारवाई केली.

Web Title: Action taken against 17 hotels violating curfew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.