अनधिकृतपणे जनावरांची वाहतूक करणारा टेम्पो पकडून तिघांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:26 AM2021-05-06T04:26:28+5:302021-05-06T04:26:28+5:30
विनापरवाना जनावरांची (गायीची) वाहतूक करताना तरबेज ठाकूर (रा. सौंदळ, ता.राजापूर), राजेंद्र सुतार, साहील मकानदार (दोघेही रा. कसबा तारळे, ...
विनापरवाना जनावरांची (गायीची) वाहतूक करताना तरबेज ठाकूर (रा. सौंदळ, ता.राजापूर), राजेंद्र सुतार, साहील मकानदार (दोघेही रा. कसबा तारळे, ता.राधानगरी) या तिघा आरोपींना गगनबावडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडील ४ लाख ५६ हजारांचा मुद्देमाल व जनावरे जप्त करण्यात आली.
आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास गगनबावडा बोरबेट रोडवर कुंभी नदीच्या पुलावर कातळी गावच्या हद्दीत तबरेज चांदमिया ठाकूर (रा. सौंदळ, ता.राजापूर) हा आपल्या शेवरोलो कंपनीची फोर व्हीलर गाडी नंबर (MH01AX5611) टेहाळणी करत येऊन यातील टेम्पो नंबर ( MH5045) वरील चालक राजेंद्र कुंडलिक सुतार (वय ३०), साहिल रमजान मकानदार (१९, दोघे रा. कसबा तारळे, ता. राधानगरी) हे बिगर परवाना पाच गाई - नवजात वासरू अशा सहा जनावरांना टेम्पोतून दाटीवाटीने व अत्यंत त्रासदायक क्रूरपणे, वाहतुकीचा कोणताही परवाना नसताना विक्रीसाठी नेत असताना आढळल्यामुळे त्यांच्यावर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कोल्हापूर CRPC1973 मधील कलम 173 अन्वये , बंदी आदेशाची अवहेलना करून , घातक कृत्य केल्याबद्दल गगनबावडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद भार्गव महेश भाळवणी (रा. कळे) यांनी गगनबावडा पोलिसांत दाखल केल्यानंतर या तिघांना गुन्हा नोंद करून त्यांना ताब्यात घेतले आहे.