कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांसाठी कृती दल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:25 AM2021-05-21T04:25:13+5:302021-05-21T04:25:13+5:30

कोल्हापूर : कोरोनामुळे आई-वडील अशा दोन्ही पालकांचे निधन झालेल्या अनाथ बालकांची सुरक्षितता व त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या ...

Action Team for Children Orphaned by Corona | कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांसाठी कृती दल

कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांसाठी कृती दल

Next

कोल्हापूर : कोरोनामुळे आई-वडील अशा दोन्ही पालकांचे निधन झालेल्या अनाथ बालकांची सुरक्षितता व त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर कृती दल (टास्क फोर्स) स्थापन करण्यात आले आहे. या समितीकडून अनाथ झालेल्या बालकांचे संगोपन, पुनर्वसन, त्यांच्या बालहक्कांची पायमल्ली होणार नाही, याबाबत निर्णय घेतले जातील.

या समितीमध्ये आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव पंकज देशपांडे, जिल्हा बालकल्याण समितीच्या अध्यक्ष वैशाली हिंगमिरे-बुटाले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा माहिती अधिकारी, कोल्हापूर, समन्वय जिल्हा बाल संरक्षण अधिकारी एस. एन. दाते, सदस्य सचिव जिल्हा महिला व बालविकास अधिकारी एस. डी. शिंदे हे सदस्य आहेत.

--

Web Title: Action Team for Children Orphaned by Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.