राज्य बँकेतील दोषींवर कारवाई होणारच

By admin | Published: November 21, 2014 09:44 PM2014-11-21T21:44:29+5:302014-11-22T00:10:44+5:30

चंद्रकांत पाटील : ऊसदरप्रश्नी सरकारची सकारात्मक पावले

Action will be taken against the guilty in State Bank of India | राज्य बँकेतील दोषींवर कारवाई होणारच

राज्य बँकेतील दोषींवर कारवाई होणारच

Next

कोल्हापूर : राज्य सहकारी बॅँकेच्या भ्रष्टाचारातील दोषींवर कारवाई होणारच, असे स्पष्ट करून कोणाचाही मुलाहिजा ठेवला जाणार नाही, अशी माहिती सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज, शुक्रवारी शासकीय विश्रामगृह येथे नागरिकांशी संवाद साधताना पत्रकारांना दिली. राष्ट्रवादीने भाजप सरकारला पाठिंबा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर बॅँक भ्रष्टाचारातील दोषींवर कारवाई होणार का? या पत्रकारांच्या प्रश्नावर त्यांनी वरील माहिती दिली. शेतकरी संघटनांनी काल, गुरुवारीच आंदोलनाची घोषणा केली आहे. त्या पार्श्वभूमीवर बोलताना मंत्री पाटील म्हणाले, साखर कारखानदारी उद्योगातील सरकारची भूमिकाही शून्य असते. कारखानदार व ऊस उत्पादकांनीच दरावर निर्णय घेतला पाहिजे; परंतु सरकारचीही प्रत्यक्षातील भूमिका हवी. त्यामुळे कायद्याप्रमाणे स्थापन झालेली ऊस नियंत्रण समिती अशासकीय होती. त्यामध्ये आपण वा मुख्यमंत्रीही नव्हते. समिती पूर्वीच झाली असती तर दराचा प्रश्न निर्माण झाला नसता; परंतु आपण या पदावर आल्यानंतर ती तातडीने स्थापन केली.
ते म्हणाले की, काही कारखाने भ्रष्टाचार वा ते नीट न चालविल्यामुळे प्रचंड कर्जबाजारी झाले आहेत. त्यांना मदत किती करायची व त्यातून ते कसे बाहेर पडणार हा प्रश्न आहे. (प्रतिनिधी)



आठशे कोटी मिळूनही ओरड का?
सरकारने परचेस टॅक्स माफ केल्याने ८०० कोटी रुपये कारखान्यांना मिळाले आहेत. असे असतानाही त्यांच्याकडून ओरड होत असेल तर ते बरोबर नाही. साखर कारखान्यांबाबत २००० कोटी रुपये केंद्र सरकारकडे मागावे लागतील. त्यासंदर्भात केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची नुकतीच पहिली भेट आपण व मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे.

Web Title: Action will be taken against the guilty in State Bank of India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.