प्रस्ताव पाठविण्यास दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाई होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:45 AM2021-02-18T04:45:24+5:302021-02-18T04:45:24+5:30
शिक्षण उपसंचालक आणि काही संघटनेचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून बुधवारी मुंबईत हे प्रस्ताव पोहोचले. त्यासाठी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री राजेंद्र ...
शिक्षण उपसंचालक आणि काही संघटनेचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून बुधवारी मुंबईत हे प्रस्ताव पोहोचले. त्यासाठी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर, आमदार जयंत आसगावकर यांनी शिक्षणमंत्री गायकवाड यांना विनंती केली. त्यामुळे हे प्रस्ताव स्वीकारण्यात आले. कोल्हापूर विभागाचे प्रस्तावांना दिरंगाई करणाऱ्या अधिकारी सुभाष चौगुले आणि कर्मचारी केतन शिंदे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी आम्ही केली होती. त्याबाबतचे पत्र शालेय शिक्षणमंत्री गायकवाड यांना दिले होते. त्यावर त्यांनी संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले असल्याचे खंडेराव जगदाळे यांनी सांगितले. यावेळी आमदार आसगावकर, मुख्याध्यापक संघाचे सेक्रेटरी दत्ता पाटील, बाबासाहेब पाटील, दीपक पाटील, विजयसिंह गायकवाड, ज्ञानेश्वर म्हात्रे, व्ही. जी. पोवार आदी उपस्थित होते.