विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:22 AM2021-04-18T04:22:55+5:302021-04-18T04:22:55+5:30
वारणानगर : राज्यात संचारबंदी जाहीर झाली असताना मुख्य मार्गावर अनेकजण बिनकामाचे फिरताना दिसत आहेत. त्यामुळे लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यासाठी ...
वारणानगर : राज्यात संचारबंदी जाहीर झाली असताना मुख्य मार्गावर अनेकजण बिनकामाचे फिरताना दिसत आहेत. त्यामुळे लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यासाठी आता रस्त्यावरती विनाकारण फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करून त्यांच्या गाड्याही जप्त करण्यात येणार असल्याची माहिती कोडोली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिनेश काशिद यांनी दिली.
गेल्या तीन-चार दिवसांपासून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू आहे. त्यास नागरिकांनी प्रतिसाद दिला. कोडोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत आता याची कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश काशिद यांच्या मार्गादर्शनाखाली पीएसआय नरेंद्र पाटील,सागर पवार व सर्व पोलीस कर्मचारी शासनाच्या सर्व नियमांचे पालन करण्याच्या सूचना गावोगाव जाऊन देत आहेत. वारणानगर-कोडोली एमएसईबी चौक-बोरपाडळे फाटा या मुख्य मार्गावर पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. विनाकारण फिरणांऱ्यावर कारवाई करून गाड्या ताब्यात घेण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. शैलेश बलकवडे यांनी दिले आहेत. याची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन रस्त्यावर विनाकारण कोणीही फिरू नये. तसेच जिल्हा प्रशासनाला सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन दिनेश काशिद यांनी केले आहे.
फोटो ओळ -
वारणानगर-बोरपाडळे या मुख्य रस्त्यावर एमएसईबी फाटा येथे शनिवारी कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश काशिद यांनी नागरिकांची वाहने अडवून चौकशी सुरू केली.