स्टेट बँक काॅलनीत महिलांसाठी उपक्रम (वितरण व वाणिज्य वृत्त)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:22 AM2021-03-14T04:22:21+5:302021-03-14T04:22:21+5:30

कोल्हापूर : हनुमाननगर येथील स्टेट बँक कॉलनीत महिलांसाठी पाककला व फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आल्या. प्रमुख पाहुण्या म्हणून शरयू ...

Activities for Women in State Bank Time (Distribution and Commerce News) | स्टेट बँक काॅलनीत महिलांसाठी उपक्रम (वितरण व वाणिज्य वृत्त)

स्टेट बँक काॅलनीत महिलांसाठी उपक्रम (वितरण व वाणिज्य वृत्त)

Next

कोल्हापूर : हनुमाननगर येथील स्टेट बँक कॉलनीत महिलांसाठी पाककला व फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आल्या. प्रमुख पाहुण्या म्हणून शरयू डिंगणकर उपस्थित होत्या.

परीक्षक म्हणून गायत्री संत व आम्रपाली क्षीरसागर यांनी काम पाहिले. माधुरी हळबे, प्रज्ञा जाधव, युगंधरा निंबाळकर यांनी संयोजन केेले. ऊर्मिला भोसले यांनी स्वागत केले. अनुराधा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

--

ज्येष्ठ नागरिक संघातर्फे महिलांचा सन्मान

कोल्हापूर : राजर्षी शाहू ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या वतीने टाऊन हॉल विरंगुळा केंद्रात आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. संजीवनी तोफखाने उपस्थित होत्या.

यावेळी शारदा मोहिते, नलिनी जुगारे, विद्या माने, विजया रोकडे, रसिका कुलकर्णी, सपना जाधव-भालकर, श्रद्धा कुलकर्णी यांना गौरविण्यात आले. यावेळी संजीवनी तोफखाने यांनी महिलांनी अधिक समाजशील व्हावे, असे मत व्यक्त केेले. अध्यक्ष मानसिंगराव जगताप यांनी प्रास्ताविक केले. पूजा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

--

Web Title: Activities for Women in State Bank Time (Distribution and Commerce News)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.