महापालिकेतर्फे नऊ जणांना आदर्श शिक्षक पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:27 AM2021-09-05T04:27:59+5:302021-09-05T04:27:59+5:30

कोल्हापूर : महापालिका शिक्षण समितींतर्गंत चालविण्यात येणाऱ्या शाळेतील नऊ शिक्षक व तीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आदर्श पुरस्कार जाहीर झाला. त्यांना ...

Adarsh Shikshak Puraskar to nine persons by NMC | महापालिकेतर्फे नऊ जणांना आदर्श शिक्षक पुरस्कार

महापालिकेतर्फे नऊ जणांना आदर्श शिक्षक पुरस्कार

Next

कोल्हापूर : महापालिका शिक्षण समितींतर्गंत चालविण्यात येणाऱ्या शाळेतील नऊ शिक्षक व तीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आदर्श पुरस्कार जाहीर झाला. त्यांना डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आदर्श नावाने पुरस्कार देण्यात येणार आहे. ५ सप्टेंबरच्या शिक्षक दिनानिमित्त पुरस्कारासाठी निवडलेल्या शिक्षकांची नावे जाहीर करण्यात आली. यामध्ये जरगनगर शाळेतील तीन शिक्षकांचा सहभाग आहे. कोरोना कमी झाल्यानंतर पुरस्कार वितरण होणार असल्याचे उपायुक्त रविकांत आडसूळ यांनी सांगितले.

शिक्षक दिनानिमित्त महापालिका व खासगी अनुदानित शाळांतील ज्या शिक्षकांनी शैक्षणिक, सामाजिक, विविध उपक्रम, स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी बजावून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिले आहे, अशा शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यंदा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी महापालिकेच्या पाच शाळांतील व खासगी अनुदानित चार शाळांतील मुख्याध्यापक, सहाय्यक शिक्षकांनी प्रस्ताव पाठविले होते. यातून निवड समितीने पात्र शिक्षकांची निवड पुरस्कारासाठी केली.

पुरस्कारासाठी निवडलेल्या शिक्षकांची व कंसात शाळांची नावे अशी : महापालिका शाळा आदर्श शिक्षक गट : कविता सरदेसाई, स्वाती ढोबळे, सरिता सुतार (लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर), नेताजी फराकटे (लोणार वसाहत, विद्यामंदिर), राजश्री पोळ, (संत रोहिदास विद्यामंदिर).

खासगी अनुदानित शाळा गट : उज्ज्वला जाधव (डॉ. दीपक साळुंखे विद्यामंदिर), राजेंद्र कोरे (श्री. सिद्धेश्वर प्रासादिक विद्यालय, विक्रमनगर), किरण खटाव (डॉ. श्रीधर सावंत विद्यामंदिर), धनश्री जोशी (शेलाजी वन्नाजी संघवी विद्यालय). विशेष शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार : अजय गोसावी (प्राथमिक शिक्षण समिती), रमेश पारखे (संत रोहिदास विद्यामंदिर, सुभाषनगर), शिवाजी जाधव (स्वर्गीय यशवंतराव चव्हाण विद्यामंदिर).

(१२ फोटो स्वतंत्र देत आहे) शिक्षक पुरस्कार या नांवाने

Web Title: Adarsh Shikshak Puraskar to nine persons by NMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.