शेती नुकसान बातमी जोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:26 AM2021-07-27T04:26:25+5:302021-07-27T04:26:25+5:30

जिल्ह्यात ३ लाख ६३ हजार १५५ हेक्टर एकूण खरिपाचे क्षेत्र आहे. त्यापैकी ३ लाख ४१ हजार ६९२ हेक्टरवरील क्षेत्रावरील ...

Added farm damage news | शेती नुकसान बातमी जोड

शेती नुकसान बातमी जोड

Next

जिल्ह्यात ३ लाख ६३ हजार १५५ हेक्टर एकूण खरिपाचे क्षेत्र आहे. त्यापैकी ३ लाख ४१ हजार ६९२ हेक्टरवरील क्षेत्रावरील पेरणी २० जुलैपर्यंत पूर्ण झाली. यातील उसाचे १ लाख ६८ हजार हेक्टरवरील बारमाही पीक वगळले तर निव्वळ खरिपाचे क्षेत्र २ लाख ४ हजार २३५ हेक्टर आहे. त्यातील १ लाख ७३ हजार ५४३ हेक्टरवरील पूर्ण झाल्या होत्या. आता त्यापैकी जवळपास ५९ हजार हेक्टर पीक पुरामुळे बाधित झाल्याने ही नुकसानीची टक्केवारी ३४ टक्के एवढी होते.

चौकट

२०१९ च्या तुलनेत कमी फटका

दोन वर्षांपूर्वी २०१९ मध्ये आलेल्या महापुरात शेतीचे नुकसान आजच्या तुलनेत जास्त होते. २८६ पूरबधित गावात ७८ कोटींचे नुकसान झाले होते. तेव्हा पूर ८ दिवसांपेक्षा जास्त राहिला होता, त्यामुळेदेखील नुकसानीचे प्रमाण जास्त होते. या उलट यावर्षी पूर ४ दिवसातच बऱ्यापैकी ओसरू लागल्याने आणि कडक ऊनही पडल्याने पुरात बुडालेल्या पिकांना काही प्रमाणात जीवदान मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.

Web Title: Added farm damage news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.