सुशोभीकरणाच्या कामांमुळे चांदोली धरणाच्या वैभवात भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:16 AM2021-06-23T04:16:30+5:302021-06-23T04:16:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शित्तूर-वारूण : ...

Addition to the splendor of Chandoli Dam | सुशोभीकरणाच्या कामांमुळे चांदोली धरणाच्या वैभवात भर

सुशोभीकरणाच्या कामांमुळे चांदोली धरणाच्या वैभवात भर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

शित्तूर-वारूण : हिरव्यागर्द झाडीने नटलेल्या डोंगरदऱ्या व मध्यभागी असलेल्या चांदोली धरणाच्या वैभवामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, स्ट्रीट लाईट, गाड्यांचे पार्किंग, वारणा धरण नावाची कमान व सुशोभीकरणाच्या कामामुळे आणखीच भर पडली आहे.

चांदोली धरण हे ३४.४० टीएमसी पाणीसाठवण क्षमता असलेले, देशातील सर्वांत मोठे मातीचे धरण आहे. या धरणामुळे हा परिसर वर्षाचे बाराही महिने हिरवळीने नटलेला असतो. हे धरण वसंतसागर जलाशय व वारणा धरण या नावानेही ओळखले जाते. याला लागून असलेले चांदोली राष्ट्रीय उद्यान व हे धरण पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या विविध ठिकाणांहून वर्षाला हजारो पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात.

सुशोभीकरणाच्या कामांमळे चांदोली धरणाचे रुपडे आता बदलते आहे. धरणाच्या पायथ्याला 'वारणा धरण' नावाने सुसज्ज लोखंडी गेट बांधण्यात आले आहे. धरण पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या गाड्यांसाठी पार्किंगची व्यवस्था व्हावी या हेतूने पार्किंग शेड बांधण्यात आले आहे. खूप वर्षांपासून तेथे अस्तित्वात असलेल्या वडाच्या झाडाभोवती ज्याला पूर्वी 'पार' म्हटले जायचे, तो कट्टादेखील नव्याने बांधण्यात आला आहे. गेटला लागून बांधण्यात आलेल्या बाजूच्या भिंतींचे बांधकामसुद्धा घडीव दगडांमध्ये करण्यात आले आहे.

गेटच्या आतमध्ये काही अंतरापर्यंत येण्या-जाण्यासाठी वेगवेगळे रस्ते, त्याच्या दोन्ही बाजूंना गटारी व त्याला लागूनच पेव्हिंग ब्लॉक बसविण्याचे काम सुरू आहे. दोन्ही रस्त्यांच्या मधोमध असलेला कठडा सुशोभित करून त्यामध्ये वृक्षलागवड करण्यात आली आहे. संपूर्ण धरण परिसरातील स्ट्रीट लाईट व सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे चांदोली धरणाच्या वैभवात अधिकच भर पडली आहे.

टी. एस. धामणकर (शाखाधिकारी)

चांदोली धरण पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना पार्किंगसारखी सुविधा व आकर्षण वाटावे अशी सुशोभीकरणाची कामे या ठिकाणी करण्यात आली आहेत. याही वर्षी पूरनियंत्रण करण्याच्या दृष्टीने धरण प्रशासनाची संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे.

फोटो : २२ चांदोली

चांदोली धरणाच्या वैभवात भर घालत असलेली कमान, पार्किंग व्यवस्था, घडीव दगडांमधील बाजूच्या भिंती, धरण परिसरातील स्ट्रीट लाईट

(छाया : सतीश नांगरे)

Web Title: Addition to the splendor of Chandoli Dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.