अतिरिक्त ९६ माध्यमिक शिक्षकांचे समायोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 09:16 PM2017-10-13T21:16:56+5:302017-10-13T21:18:42+5:30
कोल्हापूर : जिल्'ातील ९६ अतिरिक्त माध्यमिक शिक्षकांचे समायोजन झाले असून ३३ जणांचे विभागीय समायोजन करण्यात येणार आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्'ातील ९६ अतिरिक्त माध्यमिक शिक्षकांचे समायोजन झाले असून ३३ जणांचे विभागीय समायोजन करण्यात येणार आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी ही माहिती दिली.
अतिरिक्त शिक्षक संख्या ठरल्यानंतर हरकतींवर सुनावणी ही प्रक्रिया पूर्ण झाली. त्यामुळे शुक्रवारी सकाळी १२ नंतर न्यू कॉलेजवर सुरू झालेली ही समायोजन प्रक्रिया संध्याकाळी ६ पर्यंत चालली. सहा फेºयांमध्ये अतिरिक्त शिक्षकांसमोर रिक्त जागांचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी जिल्'ातील ९० शाळांमध्ये या शिक्षकांचे समायोजन करण्यात आले.
अजूनही ३३ शिक्षक अतिरिक्त असून त्यांचे विभागीय समायोजन करण्यात येणार आहे. दरम्यान, जर त्याच जिल्'ातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये या शिक्षकांना सामावून घेण्याचा शासन आदेश झाला तर त्या पद्धतीने जिल्'ातच हे समायोजन होऊ शकेल. मात्र, याबाबत अजूनही धोरणात्मक निर्णय झाला नसल्याचे सांगण्यात आले.किरण लोहार यांच्यासोबतच वेतन पथकाचे अधीक्षक शंकरराव मोरे, उपशिक्षणाधिकारी एल. जी. पाच्छापुरे, प्रभारी उपशिक्षणाधिकारी बी. डी. टोणपे, विस्तार अधिकाºयांनी या प्रक्रि येत भाग घेतला.