अतिरिक्त शिक्षक पुन्हा ‘आॅफलाईन’च

By admin | Published: October 25, 2015 11:45 PM2015-10-25T23:45:23+5:302015-10-26T00:09:02+5:30

शिक्षकांतून नाराजी : आॅनलाईन वेतन देण्याची मागणी

Additional teacher again 'Offline' | अतिरिक्त शिक्षक पुन्हा ‘आॅफलाईन’च

अतिरिक्त शिक्षक पुन्हा ‘आॅफलाईन’च

Next

सहदेव खोत- पुनवत --राज्यातील खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगरपालिकांच्या शाळांतील, अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक-शिक्षकेतरांच्या आॅफलाईन वेतनास पुन्हा डिसेंबर २०१५ पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे संबंधित शिक्षक-शिक्षकेतरांतून नाराजी व्यक्त होत असून त्यांना अनेक अडचणींना पुन्हा सामोरे जावे लागणार आहे.
२०१३-१४ च्या संचमान्यतेनंतर राज्यातील सर्व प्रकारच्या शाळांतून हजारो शिक्षक शासनाने अतिरिक्त ठरविले. अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक शिक्षकेतरांचे वेतन आॅफलाईन पद्धतीने काढण्याचा निर्णय झाला. त्यानंतर यातील काही प्रवर्गातील शिक्षकांचे अन्य शाळांत समायोजन करण्यात आले. समायोजनानंतर संबंधित शिक्षक आॅनलाईन प्रणालीत समाविष्ट झाले.
अतिरिक्त होऊन एका वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटला तरी, हजारो शिक्षकांचे समायोजन झालेले नाही. त्यातच अतिरिक्त झाल्यापासून संबंधित शिक्षकांना आॅनलाईन प्रणालीतून वगळून आॅफलाईनमध्ये टाकण्यात आले. वर्षभरापासून हे शिक्षक आॅफलाईन वेतन घेत आहेत. हे वेतन नियमित मिळत नसल्याने शिक्षकांच्यासमोर हजारो अडचणी निर्माण झाल्या आहेत. फंड, कर्जाचे हप्ते, विम्याचे हप्ते तसेच बचतीची रक्कम नियमित जात नाही. तीन चार महिन्यानंतर थकलेले वेतन मिळत आहे. त्यामुळे या शिक्षकांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
आॅफलाईनची मुदत सप्टेंबर १५ मध्ये संपली होती. त्यानंतर पुढे आपणास आॅनलाईन नियमित वेतन मिळेल अशी आशा शिक्षक धरुन होते. त्यातच आता पुन्हा या शिक्षकांना डिसेंबर २०१५ पर्यंत आॅफलाईन केल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
शाळेत नियमाप्रमाणे काम करुनही महिन्याच्या महिन्याला वेतन मिळत नसल्याने शिक्षकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. आपले समायोजन होणार, की आहे त्या ठिकाणीच आपण राहणार, तसेच आपणास आॅनलाईन वेतन केव्हा मिळणार? हे प्रश्न मात्र सध्या या शिक्षकांसाठी अनुत्तरीतच राहिले आहेत.

वर्षाचा कालावधी
अतिरिक्त होऊन वर्षाचा कालावधी लोटला तरी शिक्षकांचे समायोजन झालेले नाही. त्यातच अतिरिक्त झाल्यापासून संबंधित शिक्षकांना आॅनलाईन प्रणालीतून वगळून आॅफलाईनमध्ये टाकण्यात आले.

Web Title: Additional teacher again 'Offline'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.