आदित्य ठाकरे पूरग्रस्त बापट कॅम्प, आंबेवाडी, चिखलीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 06:08 PM2019-08-20T18:08:49+5:302019-08-20T18:16:11+5:30
कोल्हापूर : शिवसेना नेते व युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी कोल्हापूर येथील पूरग्रस्त भागातील नागरिकांना भेटी देत शिवसेनेतर्फे ...
कोल्हापूर : शिवसेना नेते व युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी कोल्हापूर येथील पूरग्रस्त भागातील नागरिकांना भेटी देत शिवसेनेतर्फे सुरु असलेल्या शिवसहाय्य योजनेद्वारे मदत कार्यात ते सहभागी झाले. ते दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत.
आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी सकाळी शाहू मार्केट यार्ड येथील बापट कॅम्प येथे कुंभार बांधवांच्या नुकसानीची पाहणी करुन पूरग्रस्तांशी संवाद साधला. यानंतर त्यांच्या हस्ते जीवनाश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, खासदार राजन विचारे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख विजय देवणे, शहरप्रमुख रविकिरण इंगवले, माजी महापौर मारुतराव कातवरे, ऋतुराज क्षिरसागर आदी उपस्थित होते.
आंबेवाडी, चिखली गावांना भेट
यानंतर आदित्य ठाकरे यांनी पूरबाधित आंबेवाडी व चिखली या गावांना भेट देऊन पूरग्रस्तांशी संवाद साधला. आंबेवाडी येथील हनुमान मंदिर आणि चिखली येथील डी.एड. कॉलेज येथे येथे त्यांच्या हस्ते पूरग्रस्त नागरिकांना साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी आमदार चंद्रदीप नरके यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.