कोगनोळी तपासणी नाक्यात कर्नाटकात प्रवेश करणाऱ्यांवर प्रशासनाची करडी नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 10:41 AM2021-02-22T10:41:50+5:302021-02-22T10:45:29+5:30
tollplaza Kognoli naka kolhapur- महाराष्ट्र व केरळमध्ये दुसऱ्या टप्प्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन कर्नाटक प्रशासनाने आंतरराज्य सीमेवर तपासणी पथक उभे केले आहे. कोगनोळी जवळील या सीमेवरून कर्नाटक राज्यात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग करूनच राज्यात प्रवेश दिला जात आहे. शेजारील राज्यांप्रमाणे आपल्या राज्यातही दुसऱ्या टप्प्याचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सावध पवित्रा घेत बाहेरून येणाऱ्या प्रवाशांवर प्रशासन करडी नजर ठेवत असल्याचे निदर्शनास येत आहे.
बाबासो हळिज्वाळे
कोगनोळी : महाराष्ट्र व केरळमध्ये दुसऱ्या टप्प्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन कर्नाटक प्रशासनाने आंतरराज्य सीमेवर तपासणी पथक उभे केले आहे. कोगनोळी जवळील या सीमेवरून कर्नाटक राज्यात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग करूनच राज्यात प्रवेश दिला जात आहे. शेजारील राज्यांप्रमाणे आपल्या राज्यातही दुसऱ्या टप्प्याचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सावध पवित्रा घेत बाहेरून येणाऱ्या प्रवाशांवर प्रशासन करडी नजर ठेवत असल्याचे निदर्शनास येत आहे.
कोगनोळी टोल नाका याठिकाणी कोरोना तपासणी पथकाची उभारणी केल्यानंतर कर्नाटक राज्यात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींना कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र अनिवार्य केले असल्याचे तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी सांगितले होते. या पार्श्वभूमीवर आज प्रांताधिकारी युकेश कुमार यांनी या तपासणी नाक्यास भेट देऊन पाहणी केली व कोरोना निगेटिव प्रमाणपत्र अनिवार्य केले असल्याच्या वक्तव्यास दुजोरा दिला.
यावेळी प्रांताधिकारी युकेश कुमार म्हणाले, प्रमाणपत्र सक्तीचे केले असले तरी त्याबाबत जनतेमध्ये जागृती होणे आवश्यक आहे. या सीमेवर वाहतूक जास्त आहे, त्याबरोबरच स्थानिक लोकांचाही वारंवार प्रवास होत असतो. या सर्व गोष्टी नियंत्रणात ठेवण्यासाठी हळूहळू पावले उचलली जात आहेत.
यावेळी निपाणी तालुका पंचायत कार्यवाहक मल्लिकार्जुन उळागड्डी, निपाणी नगरपालिकेचे आयुक्त महावीर बोरन्नावर, तालुका आरोग्य अधिकारी विठ्ठल शिंदे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
प्रांताधिकाऱ्यांचे प्रवाशांना आवाहन
टोल नाक्यावरून जाणारी वाहने थांबवून प्रांताधिकारी युकेश कुमार यांनी कर्नाटक राज्याने कोविड प्रमाणपत्र सक्तीचे केले आहे. कोरोना चाचणी करून तसे प्रमाणपत्र घेतले आहे का? अशी विचारणा केली. यावेळी अनेक वाहनधारक याबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसून आले.