प्रशासन सज्ज; उद्या मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 01:08 AM2019-04-22T01:08:54+5:302019-04-22T01:08:59+5:30

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसाठी उद्या, मंगळवारी सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत मतदान होत आहे. निवडणूक अधिकारी व ...

Administration Ready; Voting tomorrow | प्रशासन सज्ज; उद्या मतदान

प्रशासन सज्ज; उद्या मतदान

Next

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसाठी उद्या, मंगळवारी सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत मतदान होत आहे. निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांना आज, सोमवारी दुपारपर्यंत प्रशिक्षण देऊन मतदान साहित्यासह मतदान केंद्राकडे पाठविले जाईल. ईव्हीएम मशीन अचानक बंद पडल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून प्रत्येक क्षेत्रीय अधिकाºयाकडे एक ईव्हीएम मशीनचा संच देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, निवडणुकीसाठी आज, सोमवारी सकाळपासून कर्मचारी-अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देऊन ‘ईव्हीएम’, ‘व्हीव्हीपॅट’सह मतदान साहित्य द्यायला सुरुवात होणार आहे. दुपारपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. यानंतर हे साहित्य घेऊन मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व चतुर्थश्रेणी कर्मचारी आपापल्या केंद्रांकडे रवाना होणार आहेत. पहिल्या व दुसºया टप्प्यातील मतदानावेळी दोन ते तीन टक्के ईव्हीएम मशीन बंद पडली आहेत. त्या पार्श्वभूमीवर आपल्या जिल्ह्यात अशी स्थिती निर्माण होऊ नये व झाल्यास त्याला परिणामकारकरीत्या सामोरे जाण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. याकरिता क्षेत्रीय अधिकाºयांसोबत एक ‘ईव्हीएम’चा सेट दिला जाणार आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील डोंगरी भागातील काही ठिकाणे निश्चित केली असून, त्या ठिकाणी अतिरिक्त क्षेत्रीय अधिकारी नेमले आहेत. त्यांच्या वाहनावर ‘जीपीएस’ प्रणाली बसविण्यात येणार असून, त्यांच्याकडे ‘ईव्हीएम’मशीन दिली जाणार आहेत. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोल्हापूर ‘ईव्हीएम’ कंट्रोल रूम बनविण्यात आली आहे. तसेच डोंगरी भागातील मशीनमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यास त्याच्या दुरुस्तीसाठी ‘ईसीईएल’कंपनीचे इंजिनिअर सज्ज ठेवण्यात आले आहेत.
ते पुढे म्हणाले, मतदानानंतर मतदान यंत्रे ठेवण्यासाठी कोल्हापूर मतदारसंघातील स्ट्रॉँगरूम (सुरक्षा कक्ष) रमणमळा येथील शासकीय बहुउद्देशीय हॉल येथे व हातकणंगले मतदारसंघातील राजाराम तलाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे गोदाम येथे तयार करण्यात आले आहे. येथे प्रत्येकी ३२ सीसीटीव्ही कॅमेºयांची नजर राहणार आहे. याच्या सुरक्षेची जबाबदारी सेंट्रल पोलीस फोर्सकडे देण्यात आली आहे. त्यानंतर पुढील दुसºया रिंगणाची जबाबदारी ‘एसआरपीएफ’कडे असणार आहे. एक महिनाभर या ठिकाणी दिवसातून सकाळ-संध्याकाळ उपजिल्हाधिकारी व तहसीलदारांकडून तपासणी होणार आहे. ते सीसीटीव्हीचे फुटेज व व्हिडीओग्राफरचे रेकॉर्डिंग पाहून व्हिजीट बुकमध्ये आपला शेरा नोंदविणार आहेत. याशिवाय एक महसूल अधिकारी व पोलीस अधिकारी २४ तास येथे असतील.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ, आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील ४०३ मतदानकेंद्रांवर ‘वेब कास्टिंग’
जिल्ह्यातील एकूण केंद्रांपैकी १० टक्के केंद्रांवर ‘वेब कास्टिंग’ प्रणाली राबविण्यात येणार आहे. ‘सीसीटीव्ही’द्वारे ही प्रक्रिया राबवून मतदानावर लक्ष ठेवले जाणार आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील २१७ व हातकणंगले मतदारसंघातील १८६ केंद्रांवर ‘वेब कास्टिंग’ केले जाणार आहे.
‘ईव्हीएम’ आणणाºया वाहनांवर ‘जीपीएस’
मतदानानंतर ‘ईव्हीएम’ मशीन घेऊन येणाºया प्रत्येक वाहनावर ‘जीपीएस’ प्रणाली बसविण्यात आली आहे. बुधवारी (दि. २४) सकाळी ११ वाजता निवडणूक निरीक्षक हे उमेदवार व त्यांचे प्रतिनिधींसमवेत पारदर्शीपणे ईव्हीएमसह इतर बाबींची छाननी पूर्ण करतील.

Web Title: Administration Ready; Voting tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.