प्रशासन चुकत ?.. लोक ऐकत नाहीत... की विक्रेते -खरेदीदार आपलच ते खर म्हणूनच तर कोरोना घरापर्यंत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 10:58 AM2020-04-27T10:58:25+5:302020-04-27T10:59:41+5:30
कोल्हापूर : भाजी विके्रते, खरेदीदारांसमोर महापालिका आणि पोलीस प्रशासनाने अक्षरश: हात टेकले आहेत. भाजी खरेदीसाठी गर्दी करू नका, विके्रत्यांनी ...
कोल्हापूर : भाजी विके्रते, खरेदीदारांसमोर महापालिका आणि पोलीस प्रशासनाने अक्षरश: हात टेकले आहेत. भाजी खरेदीसाठी गर्दी करू नका, विके्रत्यांनी अंतर ठेवून बसा, असे वारंवार आवाहन करूनही त्याचा फारसा उपयोग झाला नसल्याचे रविवारी पुन्हा एकदा स्पष्ट झाले. लक्ष्मीपुरी, न्यू महाद्वार रोड, निवृत्ती चौकामध्ये जत्रेचे स्वरूप आले होते.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे घरात थांबणे हे आहे. मोदी सरकारने यासाठी देश लॉकडाऊन केला आहे. नागरिकांना अत्यावश्यक कारणांसाठीच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. असे असतानाही कोल्हापुरातील नागरिक भाजी खरेदीच्या कारणाने घराबाहेर पडत आहेत. तसेच भाजी विके्रते अंतर ठेवून बसत नाहीत. दर रविवारी भाजी खरेदीसाठी गर्दी होत असून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडलेला असतो. महापौर निलोफर आजरेकर, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी गर्दी कमी केली नाही तर भाजी विक्रीच बंद केली जाईल, असा इशारा देऊनही परिस्थिती सुधारलेली नाही. या उलट गर्दी वाढतच आहेत. रविवारीही लक्ष्मीपुरी येथील फोर्ड कॉर्नर ते उमा टॉकीज, पद्माराजे विद्यालयासमोरील परिसर, निवृत्त चौक या ठिकाणी भाजी विके्रते आणि खरेदीदारांनी गर्दी केली होती.
लॉकडाऊनमुळे सार्वजनिक वाहतूक बंद असल्याने शेतकऱ्यांना शहरात भाजी विक्रीसाठी येण्यास अडचणी येत आहेत. यामध्येच भाजी मंडई बंद आहे. वाहने नसणाऱ्यांचे हाल होत असून डोक्यावरून पोती आणण्याची वेळ येत आहे. त्यामुळे काही विके्रते मिळेल त्या चौकात विक्री करण्यास बसत आहेत. परिणामी फूटपाथ, रस्त्याकडेला त्यांची गर्दी होत आहे.