गोकुळवरील प्रशासकीय कारवाईचा डाव फसला, अध्यक्ष विश्वास पाटील यांचा शौमिका महाडिकांवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2023 12:17 PM2023-05-05T12:17:23+5:302023-05-05T12:18:05+5:30

या आदेशामुळे शौमिका महाडीक यांनी सत्तेचा वापर करून गोकुळवर राजकीय द्वेषापोटी प्रशासकीय कारवाईचा केलेला प्रयत्न असफल झाल्याचे स्पष्ट आहे

Administrative action against Gokul failed, President Vishwas Patil counter attack on Shoumika Mahadik | गोकुळवरील प्रशासकीय कारवाईचा डाव फसला, अध्यक्ष विश्वास पाटील यांचा शौमिका महाडिकांवर पलटवार

गोकुळवरील प्रशासकीय कारवाईचा डाव फसला, अध्यक्ष विश्वास पाटील यांचा शौमिका महाडिकांवर पलटवार

googlenewsNext

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या लेखा परीक्षण अहवालाबाबत ८ जून २०२३ पर्यंत पुढील कोणतीही कारवाई करू नये, असे आदेश उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने गुरुवारी सुनावणीत दिले आहेत. यामुळे गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांचा सत्तेचा वापर करून गोकुळवर प्रशासकीय कारवाईचा डाव फसला आहे, असा पलटवार संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकातून केला आहे.

पत्रकात म्हटले आहे, संचालिका महाडीक यांनी गोकुळ दूध संघासंबंधीच्या तक्रारीच्या अनुषंगाने दुग्ध मंत्र्यांचे आदेशानुसार लेखा परीक्षण विभागाने चाचणी लेखापरीक्षण करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाविरुद्ध गोकुळ दूध संघाने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून दुग्ध मंत्र्यांचे व लेखा परीक्षण विभागाचे आदेश रद्द करण्याची मागणी केली. त्यावर गुरुवारी सुनावणी झाली. न्यायमूर्तींनी पुढील सुनावणी ८ जूनपर्यंत चाचणी लेखा परीक्षण अहवालाबाबत शासनास पुढील कोणतीही कारवाई करू नये, असे आदेश दिले आहेत.

यामुळे विरोधकांनी सत्तेचा वापर करून राजकीय द्वेषापोटी गोकुळवर प्रशासकीय कारवाई करण्याच्या उद्देशाने नेमलेल्या चौकशीबाबत ८ जूनपर्यंत कोणतीही कार्यवाही करू नये, असे स्पष्ट आदेश दिले आहेत. या आदेशामुळे शौमिका महाडीक यांनी सत्तेचा वापर करून गोकुळवर राजकीय द्वेषापोटी प्रशासकीय कारवाईचा केलेला प्रयत्न असफल झाल्याचे स्पष्ट आहे.

Web Title: Administrative action against Gokul failed, President Vishwas Patil counter attack on Shoumika Mahadik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.