प्रशासक बलकवडे यांच्या शाळांना अचानक भेटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:20 AM2020-12-08T04:20:43+5:302020-12-08T04:20:43+5:30

कोल्हापूर : शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार शाळा सुरू आहेत की नाहीत याची पाहणी महानगरपालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सोमवारी ...

Administrator Balkwade's surprise visits to schools | प्रशासक बलकवडे यांच्या शाळांना अचानक भेटी

प्रशासक बलकवडे यांच्या शाळांना अचानक भेटी

Next

कोल्हापूर : शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार शाळा सुरू आहेत की नाहीत याची पाहणी महानगरपालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सोमवारी केली. त्यांनी शहरातील दोन शाळांना अचानक भेट दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अद्याप शाळा सुरू नाहीत; परंतु पालकांचे हमीपत्र घेऊन कांही माध्यमिक शाळा शहरात सुरू झालेल्या आहेत. या शाळांची पाहणी त्यांनी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई व प्रशासनाधिकारी शंकर यादव उपस्थित होते.

शहरात सुरू असलेल्या शाळा शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सुरू आहेत की नाहीत याची पाहणी प्रशासक बलकवडे यांनी केली. त्यांनी प्रथम महानगरपालिकेची राजमाता जिजामाता हायस्कूलला भेट दिली. तेथे इ. ९ वी व इ. १० वी चे वर्ग सुरू होते. प्रशासकांनी प्रत्यक्ष वर्गात जाऊन अध्यापनाचे निरीक्षण केले. मुलांची बैठक व्यवस्था पाहिली. प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना हात धुवायला लावून ते योग्य पद्धतीने हात धुतात की नाही तेही पाहिले. हात धुण्याच्या योग्य पद्धतीचे प्रात्यक्षिक स्वत: करून दाखविले.

थर्मल स्कॅनर व सॅनिटायझरच्या वापराबद्दल बलकवडे यांनी योग्य सूचना केल्या. सॅनिटायझरची उपलब्धता, कोरोना तपासणीबाबतचे आरटीपीसीआर रिपोर्ट स्वत: पाहिले. पालकांची संमतीपत्रे, स्वच्छतागृहे, पुरेशा पाण्याची उपलब्धता, ऑक्सिमीटर, सामाजिक अंतराचे पालन, आदी बाबींची पाहणी केली.

यानंतर खासगी व्यवस्थापनाचे वसंतराव देशमुख हायस्कूलला त्यांनी भेट दिली. तेथील नियोजनाचे प्रत्यक्ष निरीक्षण केले. थर्मल स्कॅनरचा वापर, सॅनिटायजर व विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था पाहून त्याबाबत प्रशासक बलकवडे यांनी समाधान व्यक्त केले.

फोटो क्रमांक - ०७१२२०२०-कोल-केएमसी ०१

ओळ - कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सोमवारी कोविडच्या पार्श्वभूमीवर शहरातील काही शाळांना भेटी देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली.

Web Title: Administrator Balkwade's surprise visits to schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.