कौतुकास्पद : नागरिकांनीच दिली महावितरणला अशी मोलाची साथ... कर्मचाऱ्यांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 11:45 AM2020-05-05T11:45:17+5:302020-05-05T11:47:32+5:30
महावितरणची वेबसाईट व महावितरण मोबाईल अॅपव्दारे वीज ग्राहकांनी मीटरच्या रिडिंगचे फोटो पाठविले. राज्यातील ३ लाख ६३ हजार १७५ वीज ग्राहकांनी पोर्टल व मोबाईल अॅपव्दारे दिलेल्या मुदतीत रिडिंग पाठविले आहे.
कोल्हापूर : ‘लॉकडाऊन’च्या काळात महावितरणला एप्रिल महिन्याचे वीज मीटर रिडिंग घेता आले नाही, त्यामुळे ग्राहकांनाच सेल्फ (स्वत:हून) रिडिंग घेऊन पाठविण्याचे आवाहन केले होते. त्याला राज्यातून चांगला प्रतिसाद मिळाला असून तब्बल ३ लाख ६३ हजार ग्राहकांनी रिडिंग पाठविले. कोल्हापूर जिल्ह्यातील २२ हजार ७२८ ग्राहकांचा यामध्ये समावेश आहे.
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर महावितरणने २३ मार्चपासून वीज ग्राहकांकडे जाऊन मीटर रिडिंग घेण्याची प्रक्रिया तात्पुरती बंद केली आहे. त्याचबरोबर वीज बिलांची छपाई करणे व त्याचे वितरण करणे देखील बंद असल्याने एप्रिल महिन्यातील वीज वापराचे रिडिंग घेऊन ग्राहकांनी स्वत: पाठवावे, असे आवाहन केले होते. त्याला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. महावितरणची वेबसाईट व महावितरण मोबाईल अॅपव्दारे वीज ग्राहकांनी मीटरच्या रिडिंगचे फोटो पाठविले. राज्यातील ३ लाख ६३ हजार १७५ वीज ग्राहकांनी पोर्टल व मोबाईल अॅपव्दारे दिलेल्या मुदतीत रिडिंग पाठविले आहे.
- पुणे परिमंडल- ६९,९१२. कल्याण - ५८,२१०. भांडुप - ३७,५४२. नागपूर - २७,७२०. नाशिक - २५,८३१. कोल्हापूर - २२,७२८. बारामती - २०,९४१. जळगाव - १७,६६४. औरंगाबाद - १६,३७४. अकोला- १३,७६७. अमरावती - १३,५४०. चंद्रपूर - ८,८२४. कोकण - ८,५४२. नांदेड - ७,३४८. गोंदिया - ७,२६८, लातूर - ६,९६३.