नृसिंहवाडी येथे गुरुपौर्णिमेला भाविकांना प्रवेश बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:15 AM2021-07-22T04:15:41+5:302021-07-22T04:15:41+5:30

दरवर्षी श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे मोठ्या उत्साहात गुरुपौर्णिमा साजरी होत असते. गुरुचरणांचे दर्शन, गुरुपूजन, ध्यानधारणा, अभिषेक, पूजा, आदीसाठी मोठ्या प्रमाणात ...

Admission to devotees closed on Gurupournima at Nrusinhwadi | नृसिंहवाडी येथे गुरुपौर्णिमेला भाविकांना प्रवेश बंद

नृसिंहवाडी येथे गुरुपौर्णिमेला भाविकांना प्रवेश बंद

googlenewsNext

दरवर्षी श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे मोठ्या उत्साहात गुरुपौर्णिमा साजरी होत असते. गुरुचरणांचे दर्शन, गुरुपूजन, ध्यानधारणा, अभिषेक, पूजा, आदीसाठी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रासह, गोवा, कर्नाटक, आदी राज्यांतून भाविक येत असतात. मात्र, गतवर्षापासून कोरोना महामारीमुळे मंदिरे बंद असल्याने श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे दत्तभक्त व भाविकांना येता आले नाही. सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील प्रवासास मुभा असल्याने भाविक मोठ्या संख्येने श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे गर्दी करू नयेत, तसेच कोरोना महामारीचा संसर्ग व प्रसार रोखण्याच्या अनुषंगाने शुक्रवार (दि. २३) ते शनिवार (दि. २४) जुलै अखेर गुरुपौर्णिमेनिमित्त पोलीस प्रशासन यांच्यामार्फत गावात भाविकांना प्रवेश बंदी लागू करण्यात आल्याचे सरपंच पार्वती कुंभार, उपसरपंच रमेश मोरे व ग्रामविकास अधिकारी बी. एन. टोणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे आवाहन केले आहे.

Web Title: Admission to devotees closed on Gurupournima at Nrusinhwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.