गडहिंग्लजला अकरावी विज्ञान शाखेच्या प्रवेशासाठी यंदाही केंद्रीय पद्धतीनेच प्रवेश, राज्यातील एकमेव तालुका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 04:32 PM2022-05-28T16:32:40+5:302022-05-28T17:36:16+5:30

ग्रामीण भागात तालुका पातळीवर केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविणारा गडहिंग्लज हा राज्यातील एकमेव व पहिला तालुका ठरला आहे.

Admission to Gadhinglaj for the eleventh branch of science will be done in a centralized manner only this year, in the only taluka in the state | गडहिंग्लजला अकरावी विज्ञान शाखेच्या प्रवेशासाठी यंदाही केंद्रीय पद्धतीनेच प्रवेश, राज्यातील एकमेव तालुका

गडहिंग्लजला अकरावी विज्ञान शाखेच्या प्रवेशासाठी यंदाही केंद्रीय पद्धतीनेच प्रवेश, राज्यातील एकमेव तालुका

Next

राम मगदूम

गडहिंग्लज : गेल्या पाच वर्षांपासून अकरावी विज्ञान शाखेच्या प्रवेशासाठी गडहिंग्लजमध्ये केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. यंदाही केंद्रीय प्रवेश पद्धतीचाच अवलंब केला जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागात तालुका पातळीवर केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविणारा गडहिंग्लज हा राज्यातील एकमेव व पहिला तालुका ठरला आहे.

२०१७-२०१८ मध्ये तत्कालीन गटशिक्षणाधिकारी डॉ. गणपतराव कमळकर यांनी कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या धर्तीवर गडहिंग्लज शहरात ही प्रवेश प्रक्रिया सुरू केली. तेंव्हापासून गडहिंग्लज शहरातील दहा कनिष्ठ महाविद्यालयांसाठी ही प्रवेश राबविली जाते. कोरोना महामारीच्या काळातही त्यात खंड पडला नाही.

गडहिंग्लज शहरातील एम. आर., साधना, गडहिंग्लज हायस्कूल, जागृती प्रशाला, क्रिएटिव्ह, साई इंटरनॅशनल, मराठा मंदिर, शिवराज, रचना-भडगाव या कनिष्ठ महाविद्यालयांतील प्रवेशासाठी ही प्रक्रिया राबविली जाते. त्यातील अनुदानित ६ तुकड्यांची प्रवेश क्षमता ५२०, तर विनाअनुदानित १४ तुकड्यांची प्रवेश क्षमता ११२० आहे. अनुदानित आणि विनाअनुदानित मिळून २० तुकड्यांची एकूण प्रवेश क्षमता १६४० इतकी आहे.

दरम्यान, चार दिवसांपूर्वी गटविकास अधिकारी शरद मगर यांच्या अध्यक्षतेखाली गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हलबागोळ यांच्या उपस्थितीत केंद्रीय प्रवेश समितीची बैठक झाली. त्यात येत्या शैक्षणिक वर्षातही अकरावी विज्ञानसाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय एकमताने झाला. त्यामुळे गडहिंग्लज, आजरा, चंदगड, भुदरगड, कागलसह सीमा भागातील विद्यार्थी व पालकांना दिलासा मिळाला आहे.

Web Title: Admission to Gadhinglaj for the eleventh branch of science will be done in a centralized manner only this year, in the only taluka in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.