जिल्हा परिषदेत आजपासून नागरिकांना प्रवेश बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:24 AM2021-04-06T04:24:02+5:302021-04-06T04:24:02+5:30

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी नियमावली जाहीर केल्यानंतर सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री सतेज पाटील यांनी आढावा बैठक घेतली. यानंतर ...

Admission to Zilla Parishad will be closed from today | जिल्हा परिषदेत आजपासून नागरिकांना प्रवेश बंद

जिल्हा परिषदेत आजपासून नागरिकांना प्रवेश बंद

Next

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी नियमावली जाहीर केल्यानंतर सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री सतेज पाटील यांनी आढावा बैठक घेतली. यानंतर जिल्हा परिषदेत सामान्य प्रशासनच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा देसाई यांनी माने यांच्याशी चर्चा केल्यानंतर नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

अधिकाधिक बैठका ऑनलाईन घेण्यात याव्यात, तसेच अभ्यागतांना बोलावण्यापेक्षा मेल, फोनच्या माध्यमातून काम करण्यावर भर द्यावा, अशाही सूचना परिपत्रकातून देण्यात आल्या आहेत. मार्चअखेरची कामे आता संपत आली आहेत. अशातच मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण हे मसुरीला प्रशिक्षणासाठी गेले आहेत. त्यामुळे अजयकुमार माने यांच्याकडे कार्यभार आहे. जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आणि सदस्यही ‘गोकुळ’च्या धांदलीमध्ये आहेत. त्यामुळे यापुढचे काही दिवस जिल्हा परिषदेकडील वर्दळ थंडावणार आहे.

चौकट

जिल्हा परिषदेत येणाऱ्यांसाठी नियम

१ आजपासून पदाधिकारी, सदस्य, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार यांनाच प्रवेश

२ मुख्य दरवाजावर तापाची तपासणी होणार, मास्कशिवाय प्रवेश नाही.

३ प्रवेशद्वारावर ॲन्टीजेन चाचणीची सोय करण्यात येणार असून त्या तपासणीशिवाय महत्त्वाच्या कामासाठी आलेल्या नागरिकांना आत साेडण्यात येणार नाही किंवा अतिमहत्त्वाचे काम असणाऱ्यांना ४८ तासांच्या आतील आरटीपीसीआर निगेटिव्ह अहवाल दाखवावा लागेल.

४ मार्चचे काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने बांधकाम व वित्त विभागाच्या संबंधित कर्मचाऱ्यांनी शाहू सभागृहात उपस्थित राहावयाचे असून तेथेच हे काम करावे.

चौकट

लसीकरण न करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार नाही

जिल्हा परिषदेकडील ज्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी अजूनही कोविड प्रतिबंधक लस घेतलेली नाही अशांचा एप्रिल महिन्याचा पगार काढला जाणार नाही, असा इशाराही या पत्रातून देण्यात आला आहे.

Web Title: Admission to Zilla Parishad will be closed from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.