महाशिवरात्री विशेष : चंद्रेश्वर गल्लीतील महादेव मंदिरात मनमोहक सजावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2021 12:12 PM2021-03-11T12:12:38+5:302021-03-11T12:44:15+5:30

Mahashivratri Kolhapur-महाशिवरात्रीच्या निमित्ताने शिवाजी पेठेतील चंद्रेश्वर गल्लीतील श्री महादेवाच्या मंदिरात शेवंती, झेंडू आणि बेलपत्राची मनमोहक सजावट कोरोनाचे नियम पाळून पुजाऱ्यांनी धार्मिक विधी सुरु केले. भाविकांनी प्रवेशद्वारातूनच आज महादेवाचे दर्शन घेतले.

Adorable decoration in Mahadev temple in Chandreshwar street | महाशिवरात्री विशेष : चंद्रेश्वर गल्लीतील महादेव मंदिरात मनमोहक सजावट

महाशिवरात्री विशेष : चंद्रेश्वर गल्लीतील महादेव मंदिरात मनमोहक सजावट

googlenewsNext
ठळक मुद्देमहाशिवरात्री विशेष : चंद्रेश्वर गल्लीतील महादेव मंदिरात मनमोहक सजावटझेंडूची फुले, शेवंतीची फुले तसेच बेलपत्रांचा वापर

कोल्हापूर : महाशिवरात्रीच्या निमित्ताने शिवाजी पेठेतील चंद्रेश्वर गल्लीतील श्री महादेवाच्या मंदिरात शेवंती, झेंडू आणि बेलपत्राची मनमोहक सजावट कोरोनाचे नियम पाळून पुजाऱ्यांनी धार्मिक विधी सुरु केले. भाविकांनी प्रवेशद्वारातूनच आज महादेवाचे दर्शन घेतले. 

चंद्रेश्वर गल्लीतील श्री महादेव मंदिरात महाशिवरात्रीच्या काळात दरवर्षी रंगीबेरंगी फुलांनी आकर्षक सजावट करण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून महाशिवरात्रीच्या निमित्ताने श्री महादेव मंदिराच्या गाभाऱ्यात १० किलो झेंडूची फुले, ५ किलो शेवंतीची फुले तसेच एक किलो बेलपत्रांचा आणि एक किलो मोगऱ्याचा गजरा यांचा वापर करून मनमोहक आरास करण्यात आली.

या सजावटीमुळे  महादेवाची मूर्ती आणि श्री महादेव मंदिर अधिकच सुंदर दिसत आहे. ही पूजा रोशन जोशी, प्रथमेश सरनाईक, उमेश जाधव, शुभम साळोखे, उद्धव पन्हाळकर आदींनी बांधली. या सजावटीमध्ये चन्द्रमहाल तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रथमेश सरनाईक, उपाध्यक्ष शुभम साळोखे तसेच सर्व कार्यकर्ते, सेवक सहभागी झाले होते. 

Web Title: Adorable decoration in Mahadev temple in Chandreshwar street

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.