‘एडीटीपीं’ना पाहिजे स्वेच्छा निवृत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:23 AM2021-03-05T04:23:31+5:302021-03-05T04:23:31+5:30
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या नगररचना विभागाकडील सहायक संचालक रामचंद्र महाजन यांनी स्वेच्छा निवृत्तीसाठी राज्य सरकारकडे अर्ज केला आहे. प्रकृतीच्या कारणास्तव ...
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या नगररचना विभागाकडील सहायक संचालक रामचंद्र महाजन यांनी स्वेच्छा निवृत्तीसाठी राज्य सरकारकडे अर्ज केला आहे. प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
सहा महिन्यांपूर्वीच रामचंद्र महाजन महानगरपालिकेच्या नगररचना विभागाकडे प्रतिनियुक्तीवर रुजू झाले आहेत. गेली अनेक वर्षे रिक्त असलेल्या या जागेवर महाजन यांची नेमणूक झाल्यानंतर एक पूर्णवेळ अधिकारी मिळाला, असे आशादायक वातावरण तयार झाले होते.
परंतु त्यांना प्रकृतीचा त्रास असल्यामुळे त्यांनी शासकीय सेवेतील तीन वर्षे शिल्लक असताना स्वेच्छा निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. महाजन यांची नियुक्ती राज्य सरकारमार्फत झाली होती. त्यांचे नगररचना सहायक संचालक हे पद ‘सुपर क्लास वन’ या वर्गातील असल्यामुळे त्यांना स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे पाठवावा लागतो. तसेच त्यांच्या अर्जावर निर्णय सुध्दा त्यांच्या पातळीवर होतो.