‘म्युच्युअल फंड’ ध्येयपूर्तीसाठी लाभदायी-इन्व्हेस्टमेंट मंत्र : लोकमत, आदित्य बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंडातर्फे जागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 12:39 AM2018-03-20T00:39:37+5:302018-03-20T00:39:37+5:30

Advantage-Investment Mantra for 'Mutual Fund' Mission: Lokmat, Aditya Birla Sun Life Mutual Fund Raises Awareness | ‘म्युच्युअल फंड’ ध्येयपूर्तीसाठी लाभदायी-इन्व्हेस्टमेंट मंत्र : लोकमत, आदित्य बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंडातर्फे जागृती

‘म्युच्युअल फंड’ ध्येयपूर्तीसाठी लाभदायी-इन्व्हेस्टमेंट मंत्र : लोकमत, आदित्य बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंडातर्फे जागृती

googlenewsNext

कोल्हापूर : जीवनातील स्वप्ने व ध्येये पूर्ण करण्यासाठी नियोजनबद्ध गुंतवणूक करणे ही काळाची गरज बनली आहे. गुंतवणुकीतील जोखीम कमी करण्यासाठी सर्व गुंतवणूक प्रकारांचा अभ्यास करावा. घर, मुलांचे शिक्षण, गाडी व विवाह, आदी जीवनात निश्चित केलेली अनेक स्वप्ने पूर्ण करण्यासाठी म्युच्युअल फंडात नियोजनबद्ध व अभ्यासपूर्ण गुंतवणूक करण्याचा कानमंत्र ‘आदित्य बिर्ला कॅपिटल महाराष्टÑ व गोवा’चे प्रादेशिक व्यवस्थापक प्रशांत गुप्ता व ‘आदित्य बिर्ला सनलाईफ म्युच्युअल फंड कॅपिटल’चे कॉर्पोरेट ट्रेनर नीलरत्न चौबळ यांनी कोल्हापूरच्या गुंतवणूकदारांना दिला.

कोल्हापुरातील राजारामपुरी येथील व्ही. टी. पाटील स्मृतिभवन येथे आदित्य बिर्ला व ‘लोकमत’ प्रस्तुत ‘इन्व्हेस्टमेंट मंत्र’ कार्यक्रमाच्या माध्यमातून गुंतवणूकदारांत जागृती करण्यात आली.
प्रशांत गुप्ता म्हणाले, दैनंदिन जीवनात विविध कामे करताना असलेल्या धोक्याप्रमाणे म्युच्युअल फंडातही धोका आहे; म्हणून गुंतवणूक न करणे हा त्यापेक्षाही मोठा धोका मानला जातो. गुंतवणूकदाराने आपले स्वप्न तथा ध्येय निश्चित करून, विविध योजनांची माहिती घेऊन, योग्य योजनेत पैसे गुंतविण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

गुंतवणुकीचे नियोजन करताना आपत्कालीन खर्च, निवृत्तिवेतन, मुलांचे शिक्षण, विवाह, घर, वाहनखरेदी याविषयीचे नियोजन करून, योग्य योजनेत पैसे गुंतविल्यास त्याने निश्चित केलेले ध्येय त्याला सहजतेने गाठता येते; पण त्यासाठी जादा काळासाठी गुंतवणूक फायदेशीर ठरते. त्यासाठी या व्यवसायात संयमही तितकाच महत्त्वाचा आहे, असे नीलरत्न चौबळ यांनी सांगितले.
सेमिनार ऐकण्यासाठी आलेल्या श्रोत्यांनी म्युच्युअल फंडात गुंतवणूक कशी करावी, किती वर्षांसाठी करावी व त्यासाठी कोणता प्लॅन करावा, बजेटनंतर शेअर बाजार गडगडला; मग म्युच्युअल फंडात गुंतवणूक कशी करावी, असे अनेक प्रश्न तज्ज्ञ मार्गदर्शक प्रशांत गुप्ता व नीलरत्न चौबळ यांना विचारले. त्यांनीसुद्धा उपस्थितांच्या प्रश्नांना योग्य उत्तरे देऊन समाधान केले. वरदा माळकर या लकी ड्रॉच्या विजेत्या ठरल्या.


गुंतवणुकीची कालमर्यादा : जर आपल्याला इक्विटी म्युच्युअल फंडात
गुंतवणूक करायचीअसेल तर त्या गुंतवणुकीचा किमान कालावधी पाच वर्षांचा किंवा त्याहून अधिक असावा. .गुंतवणूक क्षमता : इक्विटी म्युच्युअल फंड हा दीर्घकालीन गुंतवणूक करण्यासाठी योग्य आहे.


फंड प्रकाराप्रमाणे विभाजन : म्युच्युअल फंडात खालील प्रकार प्रामुख्याने आहेत. मनी मार्केट फंड, गिल्ट फंड, (फक्त गव्हर्न्मेंट सिक्युरिटीज) मध्ये गुंतवणूक करतांना डेन्ट फंड, बॅलन्स फंड, इक्विटी

फंडफोलिओची परिपूर्णता : पोर्टफोलिओ तयार करतांना त्यामध्ये तरलता, सुरक्षितता, रोखीकरणाची क्षमता, परतावा देण्याची क्षमता याचा योग्य मेळ घालणे आवश्यक आहे. त्यामुळे आपला पोर्ट फोलिओ परिपूर्ण बनू शकतो.

Web Title: Advantage-Investment Mantra for 'Mutual Fund' Mission: Lokmat, Aditya Birla Sun Life Mutual Fund Raises Awareness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.