(जाहिरात बातमी):
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:24 AM2021-01-03T04:24:11+5:302021-01-03T04:24:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : येथील बँक ऑफ इंडियाने व्यावसायिक सामाजिक बांधिलकीअंतर्गत कोल्हापुरातील लोटस मेडिकल फौंडेशनला मदतीचा हात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : येथील बँक ऑफ इंडियाने व्यावसायिक सामाजिक बांधिलकीअंतर्गत कोल्हापुरातील लोटस मेडिकल फौंडेशनला मदतीचा हात दिला. ही बँक नेहमीच समाजाच्या प्रगतीसाठी विविध उपक्रम राबवित असते.
एचआयव्ही, एड्सबाधित रुग्णांसाठी लोटस फौंडेशन कार्यरत असून अनेक रुग्णांचे पुनर्वसन केले आहे. राजारामपुरीतील या फौंडेशनच्या कार्यालयात बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक हेमंत खरे यांनी ७५ हजार रुपयांचा धनादेश फौंडेशनचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. किमया शाह आणि सुनील गुंडाळे यांच्याकडे सुपूर्द केला. डॉ. शाह यांनी फौंडेशनच्या कार्याची, तर हेमंत खेर यांनी बँकेच्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. अशा प्रकारे सामाजिक कार्याशी जोडले जाण्याचा आनंद होत आहे. यापुढेही बँक ऑफ इंडिया विविध सामाजिक कार्यामध्ये सहभागी होईल, असे त्यांनी सांगितले. या फौंडेशनचा उपक्रम प्रशंसनीय आहे. बँक ऑफ इंडिया नेहमीच अशा सामाजिक संस्थांच्या मदतीसाठी अग्रेसर राहिली आहे, असे या बँकेचे कोल्हापूर विभागाचे उपविभागीय व्यवस्थापक सिवा कुमार जोन्नालागड्डा यांनी सांगितले. यावेळी विक्रांत घनोकार, कुसुम हुजरे आदींसह बँकेचे कर्मचारी उपस्थित होते.
फोटो (०१०१२०२१-कोल-बँक ऑफ इंडिया) :
कोल्हापुरातील लोटस मेडिकल फौंडेशनला बँक ऑफ इंडियाच्यावतीने विभागीय व्यवस्थापक हेमंत खरे यांनी ७५ हजार रुपयांचा धनादेश फौंडेशनचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. किमया शाह आणि सुनील गुंडाळे यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी डावीकडून विक्रांत घनोकार, सिवाकुमार जोन्नालागड्डा, कुसुम हुजरे आदी उपस्थित होते.